अरे बापरे! काँग्रेस आमदार रुपकला यांनी बस चालवली पण चुकून...; अनेक वाहनांचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 09:58 AM2023-06-13T09:58:06+5:302023-06-13T10:04:38+5:30

काँग्रेसच्या आमदार रूपकला यांनी स्वत: महिलांना मोफत बस पासचे वाटप केले. एवढेच नाही तर महिलांना बसवून त्यांनी स्वतः बस चालवली.

karnataka congress mla roopkala drive bus and push back gear accidentally | अरे बापरे! काँग्रेस आमदार रुपकला यांनी बस चालवली पण चुकून...; अनेक वाहनांचं नुकसान

अरे बापरे! काँग्रेस आमदार रुपकला यांनी बस चालवली पण चुकून...; अनेक वाहनांचं नुकसान

googlenewsNext

कर्नाटकात सिद्धरामय्या सरकारने महिलांसाठी मोफत बससेवा 'शक्ती योजना' सुरू केली आहे. यावेळी काँग्रेसच्या आमदार रूपकला यांनी स्वत: महिलांना मोफत बस पासचे वाटप केले. एवढेच नाही तर महिलांना बसवून त्यांनी स्वतः बस चालवली. मात्र याच दरम्यान त्यांनी चुकून रिव्हर्स गियर मारल्याने बस मागे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना धडकली. यामुळे अनेक वाहनांचं नुकसान झालं आहे.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आमदार रूपकला चालकाच्या मदतीने बस चालवत असल्याचं पाहायला मिळत आहे. बसमध्ये अनेक महिला प्रवासी आहेत. याच दरम्यान रूपकला यांनी चुकून रिव्हर्स गिअर मारल्याने बस मागे उभ्या असलेल्या वाहनांना धडकली. यानंतर शेजारी उभ्या असलेल्या चालकाने स्टेअरिंग स्वत:च्या हातात घेतलं. सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

कर्नाटकातीलकाँग्रेस सरकारने पाच गोष्टींपैकी एक असलेली 'शक्ती' योजना लागू केल्यानंतर रविवारपासून महिलांना सरकारी बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. अधिका-यांनी सांगितले की, या मोफत प्रवास सुविधेचा 41.8 लाखांहून अधिक महिलांना फायदा होईल आणि वार्षिक 4,051.56 कोटी रुपये खर्च होतील. राज्यातील महिलांसाठी ही योजना रविवारी दुपारी एक वाजल्यापासून राज्याच्या हद्दीत लागू झाली आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या योजनेचा शुभारंभ केला, ज्याचा महिला आणि विद्यार्थिनींना फायदा होणार आहे. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी या कार्यक्रमाला उपस्थित होते, जिथे शक्ती योजनेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले आणि पाच महिलांना प्रतिकात्मकपणे शक्ती स्मार्ट कार्ड देण्यात आले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: karnataka congress mla roopkala drive bus and push back gear accidentally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.