'दलित असल्यामुळे मला तीन वेळा मुख्यमंत्री बनण्यापासून रोखले'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 01:20 PM2019-02-25T13:20:09+5:302019-02-25T13:28:02+5:30

'दलित असल्यामुळे त्यांना तीन वेळी मुख्यमंत्री बनण्यापासून रोखण्यात आले. '

karnataka deputy chief minister g parmeshwar says some in the congress party trying to stop dalits | 'दलित असल्यामुळे मला तीन वेळा मुख्यमंत्री बनण्यापासून रोखले'

'दलित असल्यामुळे मला तीन वेळा मुख्यमंत्री बनण्यापासून रोखले'

Next
ठळक मुद्दे'सरकारमध्ये दलितांसोबत भेदभाव होत आहे''मी स्वत: तीन वेळा मुख्यमंत्री पदापासून वंचित राहिलो''आमचे मोठे बंधू मल्लिकार्जुन खर्गे सुद्धा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले नाहीत'

बंगळुरु : कर्नाटकातील जेडीएस आणि काँग्रेसचे सरकार आपल्या मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानावरुन नेहमीच चर्चेत राहिले आहे. आता कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांनी असे विधान केले आहे की, दलित असल्यामुळे त्यांना तीन वेळी मुख्यमंत्री बनण्यापासून रोखण्यात आले.

दावणगेरे येथे रविवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात जी परमेश्वर यांनी काँग्रेसमधील नेत्यांवर आरोप केले आहेत. जी परमेश्वर म्हणाले, 'बसवलिंगप्पा मुख्यमंत्री बनू शकले नाहीत. के. एच. रंगनाथ यांच्यासोबत सुद्धा असेच झाले. आमचे मोठे बंधू मल्लिकार्जुन खर्गे सुद्धा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले नाहीत. मी स्वत: तीन वेळा मुख्यमंत्री पदापासून वंचित राहिलो. मात्र, काही संघर्षानंतर माझ्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली. दलित नेत्यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी दिली नाही. सरकारमध्ये सुद्धा दलितांसोबत भेदभाव होत आहे.' 

आरक्षणच्या मुद्यावरुनही जी परमेश्वर यांनी सरकारवर आरोप केले आहेत. आरक्षणाची व्यवस्था आहे. मात्र, बढतीबाबत आजही भेदभाव केला जातो. सात अधिकाऱ्यांबद्दल माहिती मिळाली आहे की, त्यांना वरच्या पदावरून खालच्या पदावर आणले. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली, असे जी परमेश्वर यांनी सांगितले. दरम्यान, याआधीही जी परमेश्वर यांनी वादग्रस्त विधाने केली आहेत. 
 

Web Title: karnataka deputy chief minister g parmeshwar says some in the congress party trying to stop dalits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.