शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

कर्नाटकचे डीजीपी प्रवीण सूद नवे सीबीआय संचालक; मोदी, सरन्याधीशांचे एकमत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 3:40 PM

सीबीआय संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ २५ मे रोजी संपणार आहे. यामुळे हे पद रिक्त होणार होते.

कर्नाटकचे डीजीपी प्रवीण सूद यांना भारत सरकारने सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती केली आहे. सूद हे 1986 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सूद यांचेच नाव सीबीआयच्या संचालकपदाच्या रेसमध्ये सर्वात पुढे होते. 

कर्नाटकच्या निवडणुकांचा निकाल पार पडल्यानंतर शनिवारी सायंकाळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश डीवाय चंद्रचूड, लोकसभेचे विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात एक महत्वाची बैठक झाली. या बैठकीत तीन आयपीएस अधिकाऱ्यांची नावे निवडण्यात आली होती. या समितीने ही नावे मंत्रिमंडळाच्या निवड समितीकडे पाठविली होती. त्यापैकी सूद यांचे नाव निवडण्यात आले. चौधरी यांनी काल ही माहिती दिली होती. 

सरन्यायाधीश आणि पंतप्रधान मोदी यांचे सूद यांच्या नावावर एकमत झाले. तर चौधरी यांनी यावर आक्षेप घेतला होता. यामुळे सूद यांची नियुक्ती सोपी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. अन्य दोन अधिकाऱ्यांमध्ये CISF प्रमुख शिलवर्धन सिंग यांचा समावेश होता, जे ऑगस्टमध्ये निवृत्त होत आहेत. एनएसजी प्रमुख एमए गणपती मार्च 2024 मध्ये निवृत्त होणार आहेत. गणपती यांच्याकडे सीबीआयचा अनुभव होता, तरी देखील सूद यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

सीबीआय संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ २५ मे रोजी संपणार आहे. यामुळे हे पद रिक्त होणार होते. सूद हे 26 तारखेला पदभार स्वीकारणार आहेत. सीबीआय संचालकाची निवड दोन वर्षांसाठी केली जाते. हा कार्यकाळ पाच वर्षांपर्यंत वाढविला जाऊ शकतो. 

संचालकांना हटविण्याचीही प्रक्रिया...1997 पूर्वी सीबीआय संचालकांना सरकार स्वतःहून कधीही हटवू शकत होते. परंतू 1997 मध्ये विनीत नारायण प्रकरणानंतर सर्वोच्च न्यायालयाने संचालकाचा कार्यकाळ कमीत कमी दोन वर्षे केला. जेणेकरून संचालक आपले काम मोकळेपणाने करू शकेल. सीबीआयच्या संचालकांना हटवण्यासाठी संपूर्ण प्रकरणाची माहिती निवड समितीकडे पाठवावी लागेल. त्याच वेळी, संचालकांच्या बदलीच्या प्रक्रियेत, सीव्हीसी, गृह सचिव आणि सचिव (कार्मिक) यांचा समावेश असलेली निवड समिती असणे देखील आवश्यक आहे. 

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागKarnatakकर्नाटक