Karnataka Election 2018 : काँग्रेससमोर सर्व पर्याय खुले - अशोक गहलोत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 09:28 AM2018-05-15T09:28:22+5:302018-05-15T11:49:13+5:30
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस पक्ष पिछाडीवर पडला आहे.
बेंगळुरू - कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस पक्ष पिछाडीवर पडला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांनी काँग्रेससमोर सर्व पर्याय खुले असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे काँग्रेसला बहुमत न मिळाल्यास जनता दल (सेक्युलर) सोबत काँग्रेस पक्ष आघाडी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मतमोजणीचे कल येऊ लागल्यानंतर अशोक गहलोत एएनआयशी बोलताना म्हणाले,कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार स्थापन करेल, असा आम्हाला विश्वास आहे. मात्र काँग्रेसला बहुमत न मिळाल्यास पक्षासमोर सर्व पर्याय खुले असतील.
These are initial trends,we hope Congress will form the Govt in Karnataka and are confident of it, but yes all options(allying with JDS) are open: Ashok Gehlot,Congress #KarnatakaElections2018pic.twitter.com/McnUbVSoPJ
— ANI (@ANI) May 15, 2018