नवी दिल्लीः कर्नाटक विधानसभेच्या २२४ पैकी २२२ जागांसाठी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ७० टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हा टक्का आणि एकंदर दिवसभरात पाहायला मिळालेला ट्रेंड या आधारे, विविध वृत्तवाहिन्या आणि एजन्सीनी कर्नाटक निवडणुकीचा एक्झिट पोल जाहीर केला आहे. त्यात, काँग्रेस, भाजपा, जेडीएस यापैकी कुठल्याच पक्षाला बहुमत मिळताना दिसत नाहीए. बघा, कुणाच्या एक्झिट पोलमध्ये कुठल्या पक्षाला झुकतं माप देण्यात आलंय...
पक्ष | टाइम्स नाऊ-व्हीएमआर | इंडिया टुडे-अॅक्सिस | एबीपी-सी व्होटर | रिपब्लिक टीव्ही-जन की बात |
काँग्रेस | 90-103 | 106-118 | 89-99 | 73-82 |
भाजपा | 80-93 | 79-92 | 97-109 | 95-114 |
जद(ध)+ | 31-39 | 22-30 | 21-30 | 32-43 |
अन्य | 2-4 | 1-4 | 1-8 | 2-3 |
काय होता ओपनियन पोल?