Karnataka Election 2023: कर्नाटकात निवडणुका जाहीर झाल्यापासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कर्नाटकात सत्ता राखण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, भाजपला या निवडणुकीत चितपट करण्यासाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. राजकीय पक्षांकडून प्रचार मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. प्रमुख पक्ष उमेदवारांच्या घोषणा करत आहेत. भाजपचे असंतुष्ट आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. यातच माजी मुख्यमंत्र्यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
काँग्रेसने आपली तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने ४३ लोकांना तिकीट दिले आहे. या यादीतून सिद्धारमैया यांचे नाव गायब आहे. त्यांना कोलारमधून तिकीट देण्यात आलेले नाही. यातच भाजपाला वरिष्ठांना डावलून युवा नेत्यांना संधी देण्याचे प्रयोग कर्नाटकात भारी पडण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात माजी उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन काँग्रेसची वाट धरलेली असताना आता जगदीश शेट्टर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. जगदीश शेट्टर यांनी उमेदवारी जाहीर करण्याचा अल्टिमेटम दिला होता. परंतु, भाजपने काही त्यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही. यामुळे अखेर त्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
भाजपने सर्व पदे दिली, मीही कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी सर्व काही केले
माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर लगेचच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या बंगळुरू येथील कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते सिद्धारमैया, केसी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या उपस्थितीत शेट्टार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपचा राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. एक विरोधी पक्षनेता म्हणून अनेक लोक आश्चर्यचकीत झाले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपने मला सर्व पदे दिली. मीही कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी सर्व काही केले. पक्ष बांधणीत मोठे योगदान दिले, असे जगदीश शेट्टार यांनी काँग्रेसमध्ये आल्यानंतर सांगितले.
जगदीश शेट्टार यांच्या धक्क्यामुळे भाजपला मोठा फटका
जगदीश शेट्टार हे लिंगायत समुदायातील आहेत. कर्नाटकात लिंगायत समाज सर्वाधिक असून तो किंगमेकर आहे. त्यामुळे शेट्टार यांच्या धक्क्यामुळे भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. भाजपने कर्नाटकात लिंगायत समाजाला डीप फ्रिजरमध्ये टाकले आहे. लिंगायत समुदायाला भाजपकडून मान सन्मान दिला जात नाही. त्यात भाजपचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचाही समावेश आहे. पक्षाने येडियुरप्पा यांना अडगळीत टाकले आहे. त्यांना शोभा करांडे यांच्या हाताखाली काम करावं लागत आहे, अशी टीका काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी केली.
दरम्यान, जगदीश शेट्टर धारवाड-हुबळी मध्य मतदारसंघातून अनेकदा आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत. उत्तर कर्नाटकातील सवदी आणि शेट्टर असे दोन नेते सोडून गेल्याने या भागात भाजपाला फटका बसण्याची शक्यता आहे. या वेळी भाजपाने तिकीट न दिल्याने शेट्टर नाराज झाले होते. शेट्टर यांचा आसपासच्या मतदारसंघात चांगला प्रभाव आहे. शेट्टर यांनी आपल्या बंडाच्या भुमिकेला येडीयुराप्पांचाही हवाला दिला आहे. येत्या १० मे रोजी मतदान होणार आहे. एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"