जिंकणाऱ्या काँग्रेसला थोपविण्यासाठी भाजपाचे 'अमेरिका मॉडेल'; कर्नाटकात आमदारांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 09:46 AM2023-04-01T09:46:47+5:302023-04-01T09:48:59+5:30

2023 Karnataka Legislative Assembly election: भाजपाचे विद्यमान आमदारांमध्ये हालचाली वाढल्या. नाराजीवर पक्षाने सांगितले की जिंकण्याची शक्यता असलेल्यांनाच तिकीट...

Karnataka election 2023: BJP's 'America Model' to take over Karnataka election win; voting to select candidate To fight with Congress | जिंकणाऱ्या काँग्रेसला थोपविण्यासाठी भाजपाचे 'अमेरिका मॉडेल'; कर्नाटकात आमदारांमध्ये नाराजी

जिंकणाऱ्या काँग्रेसला थोपविण्यासाठी भाजपाचे 'अमेरिका मॉडेल'; कर्नाटकात आमदारांमध्ये नाराजी

googlenewsNext

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि त्यानंतर लगेचच आलेल्या ओपिनिअन पोलने भाजपाची झोप उडविली आहे. काँग्रेसने तर त्यापूर्वीच आपली पहिली यादी जाहीर केली होती. असे असताना आता भाजपाने निवडणुकीपूर्वीच्या ओपिनिअन पोलवर काम करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी भाजपाने कर्नाटकात अमेरिका म़ॉडेल राबविण्यास सुरुवात केली आहे. 

काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. दुसरी यादी बनविताना कस लागत आहे. परंतू, भाजपाला ओपिनिअन पोलनी हादरे बसले आहेत. काँग्रेस-निजद सरकार पाडून भाजपाने सत्ता हिसकावली असली तरी ओपिनिअन पोलनुसार जनमत भाजपाच्या विरोधात गेले आहे. यामुळे सत्ता असूनही भाजपा पुन्हा सत्तेत येऊ शकत नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. तसे कर्नाटक राज्य हे नेहमी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाणारे राज्य आहे. परंतू, गेल्या वेळी काँग्रेस सत्तेत होती, त्यांना कमी जागा मिळाल्या होत्या. तर निजदला काही जागा मिळाल्या होत्या. हे संख्याबळ सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेसे असल्याने त्यांनी भाजपविरोधात सत्ता स्थापन केली होती. भाजपाने ही सत्ता उलथवून टाकली होती.

आता काँग्रेसचा विजय डोळ्यासमोर दिसत असल्याने भाजपाने अमेरिका म़ॉडेल आणले आहे. अनेक जागांवर भाजपाला काँग्रेस आणि निजदकडून टक्कर मिळत आहे. यामुळे भाजपाने उमेदवार निवडताना त्या त्या मतदारसंघात भाजपाच्या सदस्यांचे मतदान घेण्यास सुरुवात केली आहे. २२४ जागांवर प्राथमिक चर्चा झाली आहे. या जागांवर कोणता उमेदवार काँग्रेसला टक्कर देऊ शकतो, याबाबत चाचपणी सुरु असून इच्छुकांच्या नावावर मतदान घेतले आहे.

प्रत्येक मतदार संघात असे तीन संभाव्य उमेदवार निवडले जाणार आहेत. त्या मतदानावर व तुल्यबळ लढतीवर लक्ष केंद्रीत करत जाती-पातीचे समीकरण जुळवत भाजपा आपले उमेदवार जाहीर करणार आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडताना जसे मतदान होते, तसे भाजपाने आपल्या स्तरावर घेतले आहे. 

काय होती योजना...
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन वरिष्ठ सदस्यांना मतदानाची देखरेख ठेवण्यासाठी पर्यवेक्षक म्हणून निवडण्यात आले होते. एका मतदारसंघासाठी सरासरी १५० सदस्यांनी मतदान केले. मंडळ समितीचे अध्यक्ष आणि सदस्य, सात मोर्चा आणि विंगच्या संघटनांचे हे सदस्य होते. यामध्ये महिला, एससी, एसटी, ओबीसी, युवा, शेतकरी, अल्पसंख्यांक सदस्यांना मतदानाची संधी देण्यात आली होती. 

भाजपा आमदार नाराज...
भाजपाने अंतर्गत अशाप्रकारे मतदान प्रक्रिया राबविल्याने भाजपाचे विद्यमान आमदार नाराज झाले आहेत. या आमदारांना तिकीट मिळेल की नवा चेहरा दिला जाईल याबाबत ते साशंक आहेत. पक्षाने केवळ जिंकण्याची क्षमता असलेल्या आमदारांना चिंता करण्याची गरज नाही, एवढेच संकेत दिल्याने सर्वांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे.

Web Title: Karnataka election 2023: BJP's 'America Model' to take over Karnataka election win; voting to select candidate To fight with Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.