Karnataka Election 2023: आता कर्नाटक विधानसभा निवडणुकीत शरद पवारांची एन्ट्री, 45 जागांवर उमेदवार उतरवणार NCP

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 01:28 AM2023-04-15T01:28:48+5:302023-04-15T01:30:19+5:30

राजकीय जाणकारांच्या मते, राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे...

Karnataka Election 2023 Now Sharad Pawar's entry in Karnataka assembly elections, NCP will field candidates on 45 seats | Karnataka Election 2023: आता कर्नाटक विधानसभा निवडणुकीत शरद पवारांची एन्ट्री, 45 जागांवर उमेदवार उतरवणार NCP

Karnataka Election 2023: आता कर्नाटक विधानसभा निवडणुकीत शरद पवारांची एन्ट्री, 45 जागांवर उमेदवार उतरवणार NCP

googlenewsNext

कर्नाटक विधान सभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. खरे तर भारतीय जनता पक्ष (भाजप), काँग्रेस (काँग्रेस) आणि जेडीएसमुळे ही निवडणूक आधीच तिरंगी झाली होती. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एन्ट्रीमुळे ही निवडणूक अधिकच चुरशीची होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, आपला पक्ष कर्नाटकातील 224 विधानसभा जागांपैकी 40 ते 45 जागा लढवणार असल्याचे गुरुवारी सांगीतले होते. तसेच कर्नाटक निवडणुकीसंदर्भात योजना निश्चित करण्यासाठी शनिवारी मुंबईत बैठक घेणार असल्याचेही पवार यांनी म्हटले होते.

लवकरच निश्चित करणार उमेदवार यादी -
शरद पवार यांनी शनिवारी मुंबई येथील पक्ष कार्यालयात बैठक बोलावली आहे. यासाठी कर्नाटकातील सर्व प्रमुख नेत्यांना बोलावण्यात आले आहे. कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकीसाठी आमचा पक्ष लवकरच उमेदवारांची यादी निश्चित करेल, असेही पवार यांनी म्हणाले आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. खरे तर, गोवा, मेघालय आणि मणिपूर या राज्यांमध्ये राष्ट्रवादीला काँग्रेसला फारसा फायदा झाला नाही. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे निवडणूक चिन्हासंदर्भात अर्जही केला होता, तो आयोगाने स्वीकारला आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी एकत्रीत येण्याचा प्लॅन -
शरद पवार यांनी नुकतीच काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी ही घोषणा केली आहे. सर्वच विरोधी पक्ष एकत्रित येऊन 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मात देण्याची योजना आखत आहेत. महत्वाचे म्हणजे, यावेळी कर्नाटकात 10 मे रोजी एकाच टप्प्यात सर्व जागांवर मतदान होणार आहे. तसेच लगेचत तीन दिवसांनी म्हणजेच 13 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
 

Web Title: Karnataka Election 2023 Now Sharad Pawar's entry in Karnataka assembly elections, NCP will field candidates on 45 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.