शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

Karnataka Election 2023: मतदानाच्या एक दिवस आधी PM मोदींचे कर्नाटकातील जनतेच्या नावे पत्र, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 18:33 IST

Karnataka Elections: कर्नाटकात उद्या (10 मे) विधानसभेसाठी मतदान होणार आहे.

Karnataka Elections: कर्नाटकात उद्या (10 मे) विधानसभेसाठी मतदान होणार आहे. राज्यात 38 वर्षांपासून सुरू असलेली सत्ताविरोधी लाट मोडून काढत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवण्याचे ध्येय सत्ताधारी भाजपने ठेवले आहे. दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेला एक पत्र जारी केले. पीएम मोदींनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओही शेअर केला, ज्यात त्यांनी जनतेला मतदान करण्याचे आवाहनही केले आहे. जाणून घ्या पंतप्रधान मोदींनी पत्रात काय लिहिले..?

मोदींचे कर्नाटकातील जनतेला पत्रपीएम मोदींनी आपल्या पत्रात लिहिले की, तुम्ही माझ्यावर नेहमीच प्रेमाचा वर्षाव केला आहे. तुमचे प्रेम मला दैवी वरदान वाटते. स्वातंत्र्याच्या अमृत काळात आपण भारतीयांनी आपल्या प्रिय देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचे ध्येय ठेवले आहे. कर्नाटक आपले व्हिजन साकार करण्यासाठी चळवळीचे नेतृत्व करण्यास उत्सुक आहे. भारत ही पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे. आमचे पुढील लक्ष्य पहिल्या तीनमध्ये पोहोचण्याचे आहे. हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा कर्नाटक झपाट्याने वाढून $1 ट्रिलियनची अर्थव्यवस्था होईल. पत्रात त्यांनी आपल्या पक्षाची कर्नाटकातील जनतेशी असलेली बांधिलकी अधोरेखित केली आहे.

पंतप्रधानांनी पुढे लिहिले की, कोविड-19 महामारीच्या काळात कर्नाटकला भाजप सरकारच्या अंतर्गत परकीय गुंतवणुकीच्या रूपात वार्षिक 90,000 कोटी रुपये मिळाले. आधीच्या सरकारच्या काळात हे सुमारे 30,000 कोटी रुपये होते. आम्हाला कर्नाटकला गुंतवणूक, उद्योग आणि नवोन्मेषात नंबर-1 आणि शिक्षण, रोजगार आणि उद्योजकतेमध्ये नंबर 1 बनवायचे आहे. ग्रामीण आणि शहरी पायाभूत सुविधा, वाहतूक आणि नोकऱ्यांशी संबंधित चिंतेचे उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी लिहिले की कर्नाटकातील भाजप सरकार पुढील पिढीच्या शहरी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी, वाहतुकीचे आधुनिकीकरण, ग्रामीण आणि शहरी भागातील जीवनमान सुधारण्यासाठी आणि महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे म्हटले.

मतदान करण्यासाठी व्हिडिओतून आवाहन

याशिवाय पीएम मोदींनी त्यांच्या ट्विटरवरुन एक व्हिडिओ संदेशही शेअर केला आहे. त्यात त्यांनी कर्नाटक राज्याला 'नंबर-1' करण्यासाठी निवडणुकीच्या दिवशी मतदान करण्याचे आवाहनही केले.

बंगळुरुमध्ये 26 किलोमीटरचा रोड शो शनिवारी (6 मे), पीएम मोदींनी राज्यातील भाजपच्या आक्रमक प्रचाराचा भाग म्हणून बंगळुरुमध्ये 26 किमीचा रोड शो केला. दरम्यान, राज्यात भाजपने 224, काँग्रेसने 223 आणि जेडीएसने 207 उमेदवार उभे केले आहेत. कर्नाटकात 5.2 कोटी पात्र मतदारांपैकी 9.17 लाख पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. 224 जागांच्या कर्नाटक विधानसभेसाठी बुधवारी (10 मे) मतदानाला सुरुवात होणार असून, 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकBJPभाजपा