Karnataka Election 2023: बेळगावात प्रणिती शिंदेंची सभा उधळली, काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ केलेलं आयोजन 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 10:25 PM2023-05-05T22:25:03+5:302023-05-05T22:26:26+5:30

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी येत्या १० मे रोजी मतदान पार पडणार आहे.

Karnataka Election 2023 Praniti Shinde s rally in Belgaum was cancelled it was organized to campaign for the Congress candidate | Karnataka Election 2023: बेळगावात प्रणिती शिंदेंची सभा उधळली, काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ केलेलं आयोजन 

Karnataka Election 2023: बेळगावात प्रणिती शिंदेंची सभा उधळली, काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ केलेलं आयोजन 

googlenewsNext

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी येत्या १० मे रोजी मतदान पार पडणार आहे. तसंच १३ मे रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र जोरदार प्रचारसभा सुरू आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संजय राऊत, देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारांच्या प्रचारार्थ हजेरी लावली होती. दरम्यान, बेळगाव जवलच्या देसून येथे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ आलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांची सभा उधळून लावण्यात आली आहे.

देसूरमध्ये शुक्रवारी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ प्रणिती शिंदे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु या सभेत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काही कार्यकर्त्यांनी शिरून सभा उधळल्याचं म्हटलं जात आहे. भगवे झेंडे घेऊन आणि जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्ते या सभेत शिरले आणि त्यांनी ही सभा उधळून लावली.

राऊतांचीही सभा

गुरूवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची सभादेखील बेळगावात पार पडली. या सभेत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. 

फडणवीसांना दाखवले काळे झेंडे

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावकडे विशेष लक्ष लागून राहिलं आहे. मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्रातील नेतेमंडळीही प्रचारात सहभागी झाले आहेत. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी बेळगावात प्रचारसभेसाठी गेले असता महाराष्ट्र एकीकरण समितीनं फडणवीसांना काळे झेंडे दाखवले. यामुळे एकच गोंधळ उडाला होता.

Web Title: Karnataka Election 2023 Praniti Shinde s rally in Belgaum was cancelled it was organized to campaign for the Congress candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.