शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"कर्नाटक म्हणजे लोकसभा नाही, हुरळून जाऊ नका!" शशी थरुर यांचा काँग्रेसला सल्लावजा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 08:20 IST

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा विजय मिळाला. परंतु आता यावरून काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी आपल्या पक्षाला हुरळून न जाण्याचा सल्ला दिलाय.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा विजय मिळाला. परंतु आता यावरून काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी आपल्या पक्षाला हुरळून न जाण्याचा सल्ला दिलाय. राज्य आणि लोकसभेदरम्यान मतदार आपले विचार बदलू शकतात, त्यामुळे हुरळून जाऊ नये, असं शशी थरुर म्हणाले. यासाठी त्यांनी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये गेल्या वेळी काँग्रेसच्या विजयानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खराब कामगिरीचा दाखला दिला.

"२०१८ मध्ये आम्ही केवळ कर्नाटकातच नाही, तर राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्यप्रदेशातही विजय मिळवला होता. यानंतरही जेव्हा लोकसभेच्या निवडणुका आल्या तेव्हा त्या त्या तिन्ही राज्यांमध्ये भाजपचं आमचा पराभव केला. कर्नाटकात केवळ एकच जागा मिळाली होती," असं थरुर म्हणाले. शशी थरूर यांनी नुकत्याच झालेल्या जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलच्या वॅलाडोलिड एडिशनच्या निमित्ताने पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना यावर भाष्य केलं.

"लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये असलेल्या काही महिन्यांत मतदार आपले विचार बदलू शकतात. त्यामुळे आपण आत्मसंतुष्ट राहू नये," असं ते म्हणाले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला २२४ पैकी १३५ जागांवर विजय मिळाला होता. तर भाजपला केवळ ६६ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. मजबूत आणि प्रभावी स्थानिक नेतृत्वामुळे, तसंच स्थानिक मुद्द्यांना प्राधान्य दिल्यानं कर्नाटकात विजय मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं.

स्थानिक नेत्यांचं नेतृत्व"काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे हेदेखील कर्नाटकातील आहेत. राहुल आणि प्रियांका गांधीदेखील या ठिकाणी प्रचारासाठी पोहोचले होते. परंतु स्थानिक नेत्यांनी या ठिकाणी नेतृत्व केलं हे महत्त्वाचं आहे. स्थानिक मुद्दे , आर्थिक मुद्दे, बंगळुरूतील पायाभूत सुविधांसारख्या मुद्द्यांवर भर देण्यात आला होता," असं थरुर यांनी स्पष्ट केलं.

म्हणून भाजपचा पराभव"भाजपचा निवडणूक प्रचार केंद्राने चालवला होता. भाजप स्थानिक पातळीवर कमकुवत आहे. लोकांना माहीत होतं की, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह कर्नाटकात सरकार चालवायला येणार नाहीत. लोकांना बदल हवा होता," असंही त्यांनी नमूद केलं. "मतभेद स्वाभाविक आहेत. राजकारणात लोकांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा असणं स्वाभाविक आहे. ते पक्षाच्या विचारधारेशी आणि पक्षाच्या एकूण अजेंडासाठी वचनबद्ध असू शकतात. तो अजेंडा पुढे चालवण्यासाठी आपण अधिक योग्य आहोत असं प्रत्येक व्यक्तीला वाटू शकतं," असं थरुर म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसShashi Tharoorशशी थरूरKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकlok sabhaलोकसभा