Karnataka Elction: 'पहिले अडीच वर्ष मला मुख्यमंत्री करा'; उपमुख्यमंत्रिपद घेण्यास डीके शिवकुमार यांचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 20:49 IST2023-05-17T20:17:36+5:302023-05-17T20:49:15+5:30
Karnataka Elction: काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन सुरू असलेला गोंधळ कायम आहे.

Karnataka Elction: 'पहिले अडीच वर्ष मला मुख्यमंत्री करा'; उपमुख्यमंत्रिपद घेण्यास डीके शिवकुमार यांचा नकार
Karnataka Elction: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून चार दिवस झाले, पण अध्याप काँग्रेसला आपला मुख्यमंत्री ठरवता आला नाही. चार दिवसांपासून काँग्रेस हायकमांडच्या बैठका सुरू असून, डीके शिवकुमार आणि सिद्धरामैय्या यांच्या नावावर एकमत होऊ शकलेलं नाही. दोन्ही नेते मुख्यमंत्रिपदावर ठाम आहेत. यात अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्याची चर्चा होत आहे. पण, शिवकुमार यांनी एक अट घातली आहे.
#UPDATE | #WATCH | Karnataka Congress president DK Shivakumar returns to the residence of his brother & party MP DK Suresh, after meeting party's incharge for the state, Randeep Surjewala in Delhi. pic.twitter.com/RBut5bFMWH
— ANI (@ANI) May 17, 2023
कर्नाटक मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत अखेरपर्यंत डीके शिवकुमार यांची वरचड पाहायला मिळत होती, पण अखेरच्या क्षणी सिद्धरामैय्या यांचे नाव पुढे आले. तसेच, पक्षाने डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रिपदासह महत्वाची खाती देऊ केली आहेत. पण, शिवकुमार यावर समाधानी नाहीत. यातच आता मीडिया रिपोर्टनुसार, अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा पुढे आली आहे. मात्र, शिवकुमार यांनी पहिले अडीच वर्षे त्यांना मुख्यमंत्रिपद देण्याची मागणी केली आहे.
डीके शिवकुमार यांनी हायकमांडला स्पष्टपणे सांगितले आहे की, त्यांना मुख्यमंत्रिपदाशिवाय दुसरं काहीही नकोय. पहिला अडीच वर्षांचा कार्यकाळ मला द्यावा तर दुसरा सिद्धरामय्या यांना द्यावा. अशी अट त्यांनी हायकमांडसमोर ठेवली आहे. डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे आता काँग्रेस हायकमांड पुन्हा बैठक घेऊन निर्णय घेणार आहे.