ओपिनियन पोल : कर्नाटकात सर्वात मोठा पक्ष काँग्रसच, पण सत्तेच्या चाव्या जेडीएसकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2018 08:53 AM2018-04-15T08:53:54+5:302018-04-15T08:54:07+5:30

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. तर 15 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

karnataka election opinion poll congress may be the biggest party jds will be kingmaker | ओपिनियन पोल : कर्नाटकात सर्वात मोठा पक्ष काँग्रसच, पण सत्तेच्या चाव्या जेडीएसकडे

ओपिनियन पोल : कर्नाटकात सर्वात मोठा पक्ष काँग्रसच, पण सत्तेच्या चाव्या जेडीएसकडे

Next

नवी दिल्ली - कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. तर 15 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता कर्नाटकात प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. त्याआधी काल इंडिया टुडेच्या सर्व्हेत कर्नाटकामध्ये काँग्रेसला भाजपपेक्षा अधिक जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कर्नाटकात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील पण सत्तेच्या चाव्या जनता दल सेक्युलर (जेडीएस) या पक्षाकडे असतील असा अंदाज या ओपिनियन पोलममध्ये करण्यात आला आहे. 

‘इंडिया टुडे’नं केलेल्या सर्व्हेनुसार भाजपच्या खात्यात फक्त 78 ते 86 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसला 90 ते 101 चा पल्ला गाठता येईल. याशिवाय जनता दल सेक्युलरला 34 ते 43 जागा मिळण्याची शक्यता आहे असा अंदाज या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे. 

224 जागा असणाऱ्या कर्नाटक विधानसभेचा बहुमताचा आकडा 113 असल्यानं काँग्रेस आणि भाजपमध्ये सत्तेसाठी चांगलीच चढाओढ असेल. त्यामुळे या कर्नाटकचा गड कोण काबिज करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

2013 मधील स्थिती - 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने 122 जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली होती. भाजपा आणि जेडीएसला 40-40 जागांवर समाधान मानाव लागले होते. तर 9 जागांवर अपक्ष विजयी झाले होते. 

Web Title: karnataka election opinion poll congress may be the biggest party jds will be kingmaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.