शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

Karnataka Election: प्रियंका गांधी रस्त्यावर नमाज अदा करत होत्या, मी स्वतः पाहिलंय- स्मृती इराणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2023 3:28 PM

Karnataka Election: 'इस्लाम धर्म मानणारे कधीच मूर्ती पूजक होऊ शकत नाहीत, मंदिर बांधू शकत नाहीत.'

Karnataka Election: दक्षिणेकडील राज्य कर्नाटकमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. एकीकडे भाजप आपली सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत आहे, तर काँग्रेस भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. यादरम्यान, दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर सौम्य ते अतिशय तीव्र टीकाही होत आहे. यातच आता भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या एका वक्तव्याने नवीन चर्चेला तोंड फोडले आहे. 

बंगळुरुमध्ये टीव्ही-9 हिंदीशी बातचीतमध्ये स्मृती इराणी म्हणाल्या की, मी 2019 मध्ये काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांना म्हणाले होते की, ते मुख्यमंत्री होणार नाहीत, त्यामुळे त्यांनी मंदिराचे आश्वासन न दिलेलेच बरे. माझा त्यांना प्रश्न आहे की, असे वाक्य बोलण्यापूर्वी त्यांनी श्रीमती वाड्रा यांच्याशी काही चर्चा केली होती का? मी असे म्हणत आहे कारण, 2019 मध्ये मी श्रीमती वाड्रा यांना रस्त्यावर नमाज अदा करताना पाहिले आहे. इस्लाम धर्म मानणारे मूर्ती पूजक होऊ शकत नाहीत, मंदिर बांधू शकत नाहीत.'

कर्नाटकात भाजप सत्ते येणारकर्नाटकात भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार असल्याचा विश्वास इराणी यांनी यावेळी बोलून दाखवला. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात समान नागरी संहिता टाकून प्रत्येक धर्माच्या आणि प्रत्येक वर्गातील महिलांना सक्षम बनवण्याची आपली वचनबद्धता बळकट केली आहे. प्रत्येक गरीब कुटुंबाला वर्षभरात 3 सिलिंडर मोफत देण्याची घोषणा, महिलांसाठी मोठ्या योजना, दुग्धव्यवसायात काम करणाऱ्या महिलांसाठी इन्सेंटिव्ह वाढवण्यासाठी आम्ही वनचबद्ध आहोत, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

इराणींचा काँग्रेसवर हल्लाबोलकेंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुढे म्हणाल्या की, आम्ही शहरी गरिबांसाठी 500000 घरे देण्याचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधान घराची चावी फक्त महिलांच्या हातात देतात. काँग्रेस पक्षाला भगवान श्रीरामांची अडचण होती आणि रामभक्त बजरंगबली यांच्याशी त्यांची अडचण असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे की, जर कोणी मंचावरुन बजरंगबलीचे नाव घेतले तर काँग्रेसचे नेते त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार करतात रामभक्त आणि बजरंगबली भक्तांप्रती असा राग आणि द्वेष काँग्रेस पक्षाला शोभत नाही, असंही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीSmriti Iraniस्मृती इराणीKarnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूक