सिद्धरामैय्यांना राहुल यांचा सपोर्ट तर सोनिया गांधी शिवकुमारांच्या पाठिशी; काँग्रेसमध्ये मतभिन्नता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 06:04 PM2023-05-16T18:04:29+5:302023-05-16T18:35:45+5:30

शिवकुमार आणि सिद्धरामैय्या यांच्या गोंधळादरम्यान पक्षाचे ज्येष्ठ नेते जी परमेश्वरा यांनीही मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली आहे.

Karnataka Election: Rahul Gandhi supports Siddaramaiah while Sonia Gandhi supports DKShivkumar | सिद्धरामैय्यांना राहुल यांचा सपोर्ट तर सोनिया गांधी शिवकुमारांच्या पाठिशी; काँग्रेसमध्ये मतभिन्नता

सिद्धरामैय्यांना राहुल यांचा सपोर्ट तर सोनिया गांधी शिवकुमारांच्या पाठिशी; काँग्रेसमध्ये मतभिन्नता

googlenewsNext


Karnataka Election: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून तीन दिवस झाले, पण अद्याप काँग्रेसला मुख्यमंत्री ठरवता आला नाही. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे दोघेही या पदासाठी प्रमुख दावेदार आहेत. पण, सिद्धरामैय्या आणि शिवकुमार यांच्या नावावर पक्षात दोन गट पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या दोन्ही नेते दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी असून, पक्षश्रेष्ठींची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे.

ताज्या माहितीनुसार, या दोन नेत्यांच्या निवडीबाबत पक्षातील प्रमुख नेत्यांची मते भिन्न आहेत. राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाल यांनी सिद्धरामैय्या यांना पाठिंबा दिला आहे, तर सोनिया गांधी डीके शिवकुमार यांच्या बाजूने आहेत. यामुळे पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे अद्याप निर्णयापर्यंत पोहोचलेले नाहीत. सर्व नेत्यांशी चर्चा करुनच ते एका नावावर शिक्कामोर्तब करणार आहेत.

सिद्धरामैय्यांसोबत बहुतांश आमदार 
कर्नाटकातील विजयाचे श्रेय शिवकुमार स्वतःला देत आहेत, पण बहुतांश आमदार सिद्धरामेय्या यांच्यासोबत असल्याची माहिती आहे. पक्षाचे राष्ट्रीय नेते रणदीप सुरजेवाला दोन्ही नेत्यांबाबत तटस्थ आहेत. या सर्व गोंधळादरम्यान, पक्षाध्यक्ष खर्गे दोन्ही नेत्यांना स्वतंत्रपणे भेटणार आहेत. या बैठकीत या दोन्ही नेत्यांची मते जाणून घेतली जातील. 

मुख्यमंत्रीपदाचे तिसरे दावेदार
दरम्यान, या दोघांशिवाय कर्नाटकातील ज्येष्ठ काँग्रेस नेते जी परमेश्वरा यांनीही स्वतःला मुख्यमंत्री करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाच्या हायकमांडने सरकार चालवण्यास सांगितले तर ते जबाबदारी घेण्यास तयार असल्याचे परमेश्वरांनी मंगळवारी सांगितले. त्यांच्या पक्षसेवेची हायकमांडला जाणीव असल्याने त्यांना या पदासाठी लॉबिंग करण्याची गरज वाटत नाही, असेही ते म्हणाले. 
 

Web Title: Karnataka Election: Rahul Gandhi supports Siddaramaiah while Sonia Gandhi supports DKShivkumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.