शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
2
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
3
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
4
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
5
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
6
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
7
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
8
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
9
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात
10
भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू
11
पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले
12
डॉक्टर क्रिकेट सामना पाहत राहिले, उपचार न मिळाल्याने मुलीचा मृत्यू
13
आजच्याच दिवशी झाली होती राज्यातील राजकीय उलथापालथींना सुरुवात, पाच वर्षांत काय काय घडलं?
14
‘मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला’, माजी मॉडेलचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सनसनाटी आरोप    
15
Amit Raj Thackeray Exclusive Interview: ...त्यामुळे एकनाथ शिंदेंना दोष देता येणार नाही; अमित ठाकरेंची पहिलीवहिली राजकीय मुलाखत
16
वडगाव शेरीत मोठा ट्विस्ट: महायुतीतील दोन्ही इच्छुकांना वरिष्ठांकडून शब्द, कोणाला मिळणार उमेदवारी?
17
विमानांना धमकी देणाऱ्यांवर कारवाईची तयारी, सरकारने META आणि 'एक्स'कडून डेटा मागवला
18
Amit Raj Thackeray Exclusive Interview: मी मुख्यमंत्री झालो तरी राज ठाकरेंचा मुलगाच असेन- अमित ठाकरे
19
"अभिजीत बिचुकले स्वयंभू, जनतेनं आता..."; साताऱ्यात छत्रपती शिवेंद्रराजेंविरोधात लढणार
20
PAK vs ENG : फिरकीच्या तालावर पाहुण्यांना नाचवले; फायनल कसोटीतही पाकिस्तानच्या 'गब्बर'ची कमाल

सिद्धरामैय्यांना राहुल यांचा सपोर्ट तर सोनिया गांधी शिवकुमारांच्या पाठिशी; काँग्रेसमध्ये मतभिन्नता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 6:04 PM

शिवकुमार आणि सिद्धरामैय्या यांच्या गोंधळादरम्यान पक्षाचे ज्येष्ठ नेते जी परमेश्वरा यांनीही मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली आहे.

Karnataka Election: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून तीन दिवस झाले, पण अद्याप काँग्रेसला मुख्यमंत्री ठरवता आला नाही. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे दोघेही या पदासाठी प्रमुख दावेदार आहेत. पण, सिद्धरामैय्या आणि शिवकुमार यांच्या नावावर पक्षात दोन गट पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या दोन्ही नेते दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी असून, पक्षश्रेष्ठींची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे.

ताज्या माहितीनुसार, या दोन नेत्यांच्या निवडीबाबत पक्षातील प्रमुख नेत्यांची मते भिन्न आहेत. राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाल यांनी सिद्धरामैय्या यांना पाठिंबा दिला आहे, तर सोनिया गांधी डीके शिवकुमार यांच्या बाजूने आहेत. यामुळे पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे अद्याप निर्णयापर्यंत पोहोचलेले नाहीत. सर्व नेत्यांशी चर्चा करुनच ते एका नावावर शिक्कामोर्तब करणार आहेत.

सिद्धरामैय्यांसोबत बहुतांश आमदार कर्नाटकातील विजयाचे श्रेय शिवकुमार स्वतःला देत आहेत, पण बहुतांश आमदार सिद्धरामेय्या यांच्यासोबत असल्याची माहिती आहे. पक्षाचे राष्ट्रीय नेते रणदीप सुरजेवाला दोन्ही नेत्यांबाबत तटस्थ आहेत. या सर्व गोंधळादरम्यान, पक्षाध्यक्ष खर्गे दोन्ही नेत्यांना स्वतंत्रपणे भेटणार आहेत. या बैठकीत या दोन्ही नेत्यांची मते जाणून घेतली जातील. 

मुख्यमंत्रीपदाचे तिसरे दावेदारदरम्यान, या दोघांशिवाय कर्नाटकातील ज्येष्ठ काँग्रेस नेते जी परमेश्वरा यांनीही स्वतःला मुख्यमंत्री करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाच्या हायकमांडने सरकार चालवण्यास सांगितले तर ते जबाबदारी घेण्यास तयार असल्याचे परमेश्वरांनी मंगळवारी सांगितले. त्यांच्या पक्षसेवेची हायकमांडला जाणीव असल्याने त्यांना या पदासाठी लॉबिंग करण्याची गरज वाटत नाही, असेही ते म्हणाले.  

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेस