Karnataka Election Result : कर्नाटकात बहुमत मिळालं नाही तरी हार मानणार नाही BJP, समोर आला सरकार बनवण्याचा प्लॅन!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 12:55 PM2023-05-13T12:55:52+5:302023-05-13T12:58:03+5:30
224 जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेत भाजपच्या खात्यात 70 ते 75 जागा येताना दिसत आहेत. येत असलेल्या निकालानुसार, काँग्रेसला 122, भाजपला 71 तर जेडीएसला 24 जागा मिळताना दिसत आहेत.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजप पिछाडीवर पडल्याचे दिसत आहे. 224 जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेत भाजपच्या खात्यात 70 ते 75 जागा येताना दिसत आहेत. येत असलेल्या निकालानुसार, काँग्रेसला 122, भाजपला 71 तर जेडीएसला 24 जागा मिळताना दिसत आहेत.
काय आहे भाजपचा प्लॅन? -
येत असलेल्या निकालानुसार, भाजप बहुमतापासून बरीच दूर दिसत आहे. यामुले त्यांचे पुन्हा एकदा सत्तेवर येण्याच्या स्वप्नांवर पाणी फेरले जाऊ शकते. पण सध्या भाजपतील काही नेते आशावादी दिसत आहेत. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने आयएएनएस या वृत्तसंस्थेसोबत बोलताना म्हटले आहे की, जर आमचा आकडा बहुमतापेक्षा कमी आला, तर पक्ष सोडून गेलेल्या आणि निवडून आलेल्या माजी नेत्यांना परत आणण्याचा प्रयत्न केला जाईल. या नेत्यांना राजीनामा देऊन भाजप सरकारचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी आवाहन केले जाईल.
संबंधित भाजप नेत्याने म्हटले आहे की, पक्षाला पूर्ण बहुमतापेक्षा फार कमी जागा मिळाल्या, तर पक्ष जद (एस)ला समर्थन देईल आणि एच.डी. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री म्हणून पुढे करेल. कुमारस्वामी हे वैद्यकीय उपचारांसाठी सिंगापूरमध्ये होते. ते शनिवारी सकालीच घरी परतले आहेत.
असा आहे काँग्रेसचा प्लॅन -
काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम सरकार स्थापन करण्याला पक्षाचे प्राधान्य असेल. जर यासाठी पक्षाला दहाहून कमी जागा मिळ्याला, तर जद (एस) तोड्यान्याला प्राधान्य असेल. काँग्रेसच्या सूत्रांनी न्यूज एजन्सी आयएएनएससोबत बोलताना म्हटले आहे की, सिद्धारमय्या यांच्याकडे ही जबाबदारी देण्या आली आहे. कारण ते जद (एस) चे माजी नेते आहेत. पक्षात त्यांचा संपर्क दांडगा आहे.