कर्नाटकाच्या २९ अशा जागा, ज्या टेन्शन वाढवताहेत, 1000 पेक्षा कमी मताधिक्य कुणाचा 'गेम' करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 12:22 PM2023-05-13T12:22:42+5:302023-05-13T12:56:20+5:30

काँग्रेसने हालचाली करण्यास सुरुवात केली असून जे उमेदवार आघाडीवर आहेत ते विजयी झाल्यास त्यांना लागलीच बंगळुरुला आणण्याची तयारी सुरु केली आहे.

Karnataka Election Result 2023 : Karnataka results likely to change at any moment? Difference of leading, trailing is less on 127 seats between congress, bjp, jds | कर्नाटकाच्या २९ अशा जागा, ज्या टेन्शन वाढवताहेत, 1000 पेक्षा कमी मताधिक्य कुणाचा 'गेम' करणार?

कर्नाटकाच्या २९ अशा जागा, ज्या टेन्शन वाढवताहेत, 1000 पेक्षा कमी मताधिक्य कुणाचा 'गेम' करणार?

googlenewsNext

कर्नाटकात सुरुवातीच्या निकालांमध्ये काँग्रेस सत्तेच्या जवळ जात असल्याचे दिसत आहे. परंतू, कोणत्याही क्षणी हा निकाल बदलण्याची शक्यता आहे. जवळपास १२७ जागा अशा आहेत, ज्या ठिकाणी कधीही उलथापालथ होण्याची शक्यता आहे. अद्याप कोणत्याच जागांवर निकाल जाहीर झालेले नाहीएत. 

Karnataka Election Result 2023 : तिकीट दिले नाही म्हणून भाजप सोडणारे लक्ष्मण सवदी, जगदीश शेट्टर आघाडीवर की पिछाडीवर? पहा...

कर्नाटकात सध्याच्या कलानुसार काँग्रेस ११९, भाजपा ७२ आणि जेडीएस २४ अशा जागांवर आघाडीवर दिसत आहे. परंतू यापैकी १२७ जागा अशा आहेत, जिथे पहिल्या दोन उमेदवारांमधील मतांचा फरक हा फार कमी आहे. जरा जरी इकडे तिकडे झाले तरी यापैकी २९ जागा हातच्या जाण्याची शक्यता आहे. 

सख्खे भाऊ पक्के वैरी! माजी मुख्यमंत्र्यांचे दोन मुलगे कर्नाटकात लढताहेत, २००४ पासून उन-सावलीचा खेळ

कर्नाटकातील २९ जागांवर १००० पेक्षा कमी मताधिक्याचा फरक आहे. तर ९८ जागांवर ५००० पेक्षा कमी मताधिक्याचा फरक आहे. अद्याप मतमोजणीच्या काही फेऱ्या व्हायच्या आहेत. यामध्ये भाजपा, काँग्रेस आणि जेडीएसच्या उमेदवारांचा समावेश आहे. यामुळे पुढील फेऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला जास्त मते मिळाली तर हा कल फिरण्याची शक्यता दिसत आहे. 

काँग्रेसने हालचाली करण्यास सुरुवात केली असून जे उमेदवार आघाडीवर आहेत ते विजयी झाल्यास त्यांना लागलीच बंगळुरुला आणण्याची तयारी सुरु केली आहे. या आमदारांना गेल्यावेळेप्रमाणेच हॉटेलवर ठेवण्यात येणार आहे. यासाठी हैदराबादमध्ये रिसॉर्ट बुक केल्याची माहिती आहे. य़ा रणनितीसाठी काँग्रेसने विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. यामध्ये गरज लागलीच तर जेडीएसशी हातमिळवणी करण्याची ही चर्चा करण्यात येणार आहे. 

Web Title: Karnataka Election Result 2023 : Karnataka results likely to change at any moment? Difference of leading, trailing is less on 127 seats between congress, bjp, jds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.