बेंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपानं मोठं यश मिळवलं आहे. विजयी आणि आघाडीवर असलेल्या उमेदवारांची संख्या लक्षात घेता भाजपा कर्नाटकमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र त्यांना बहुमतासाठी 8 ते 10 जागा कमी पडताना दिसत आहेत. काँग्रेसनं नेमका या स्थितीचा फायदा घेत जेडीएसला पाठिंबा दिला आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसनं तिसऱ्या क्रमांकावरील जेडीएसला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं हे पाऊल उचललं आहे. काँग्रेसच्या या हालचाली पाहून भाजपानंही सत्ता स्थापनेचे प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेस-जेडीएसचे काही आमदार संपर्कात असल्याचा दावाही भाजपाने केला आहे. त्यामुळं सत्ता स्थापनेसाठाच्या हालचालीला वेग आला आहे. भाजपा सगळ्यात मोठा पक्ष असल्यानं सत्ता स्थापनेसाठी पहिलं निमंत्रण मिळावं, यासाठी भाजपानं प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये राज्यपाल वजुभाई वाला यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भाजपानं राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी 8 दिवसांची मुदत मागितली आहे.
मतमोजणीचे LIVE UPDATES :
- सिद्धरामय्या यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला
- कर्नाटकच्या जनतेनं काँग्रेसला नाकारलं- येडियुरप्पा
- भाजपा 72 जागांवर विजयी, तर 32 जागांवर आघाडीवर
- काँग्रेस 42 जागांवर विजयी, तर 35 जागांवर पुढे
- आम्ही काँग्रेसचा पाठिंबा स्वीकारला आहे. संध्याकाळी साडे पाचनंतर राज्यपालांची भेट घेणार- दानिश अली, प्रवक्ते, जेडीएस
- काँग्रेसचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला; राज्यपालांनी भेट नाकारली. संपूर्ण निकाल आल्यानंतरच राज्यपाल भेटीसाठी वेळ देणार.
- काँग्रेसकडून जेडीएसला पाठिंबा; भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसची खेळी
- सिद्धरामय्या चार वाजता राज्यपालांची भेट घेणार
- भाजपाचा 17 जागांवर विजय; 89 जागांवर आघाडी
- काँग्रेस 4 जागांवर विजयी; 70 जागांवर आघाडी
- भाजपा 12 जागांवर विजय; 96 जागांवर आघाडी
-काँग्रेस 2 जागांवर विजयी; 71 जागांवर आघाडी
- काँग्रेस 2 मतदारसंघात विजयी; 70 जागांवर पुढे
- भाजपा 8 जागांवर विजयी; 100 मतदारसंघात आघाडीवर
- कर्नाटकमधील विजयामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
- कर्नाटकमधील विजयाचं मुंबईतील भाजपा कार्यालयात जोरदार सेलिब्रेशन
- काँग्रेसचा एका जागेवर विजय; 69 जागांवर आघाडी
- भाजपा 4 जागांवर विजयी; 106 जागांवर आघाडी
- काँग्रेस एका जागेवर विजयी; 70 मतदारसंघांमध्ये आघाडीवर
- भाजपाला दोन जागांवर विजयी; 109 जागांवर आघाडी
- भाजपा 110 जागांवर आघाडीवर; काँग्रेस 70 मतदारसंघांमध्ये पुढे
- सर्व पक्षांना मिळालेली मतं (दुपारी 12 पर्यंतची आकडेवारी)
- भाजपा 111 जागांवर आघाडीवर; काँग्रेस 70 मतदारसंघांमध्ये पुढे
- भाजपा 111 मतदारसंघात आघाडीवर; काँग्रेस 69 मतदारसंघात पुढे
- भाजपा 113 जागांवर आघाडीवर; काँग्रेस 67 मतदारसंघांमध्ये पुढे
- भाजपा 117 मतदारसंघांमध्ये आघाडीवर; काँग्रेसची पिछेहाट, अवघ्या 63 जागांवर आघाडी
- भाजपानं बहुमताचा टप्पा ओलांडल्यानं किंगमेकर होण्याचं जेडीएसचं स्वप्न भंगलं
- काँग्रेसला मोठा धक्का; भाजपनं बहुमताचा टप्पा ओलांडला
- शत-प्रतिशत भाजपा; 117 जागांवर मुसंडी; काँग्रेसला मोठा धक्का
- भाजपा 119 जागांवर आघाडीवर; काँग्रेस 60 मतदारसंघात पुढे
- सिद्धरामय्या बदामीमधून 3499 मतांनी आघाडीवर
- भाजपाची 120 जागांवर मुसंडी; काँग्रेस 59 मतदारसंघात पुढे
- भाजपा 118 मतदारसंघात आघाडीवर; काँग्रेसची मोठी पिछेहाट, केवळ 58 मतदारसंघात आघाडी, जेडीएस 44 जागांवर पुढे
- भाजपाची जोरदार मुसंडी, 108 जागांवर आघाडी; काँग्रेस 67 जागांवर पुढे
- भाजपाची 103 जागांवर मुसंडी; काँग्रेस 68, जेडीएस 48 जागांवर आघाडीवर
- भाजपा 104, काँग्रेस 71 जागांवर पुढे; जेडीएस 40 मतदारसंघात आघाडीवर
- भाजपा 105, काँग्रेस 70 जागांवर पुढे
- भाजपाच्या आघाडीनंतर शेअर बाजारात उसळी
- भाजपा 95, काँग्रेस 81 मतदारसंघात आघाडीवर; जेडीएसची 41 जागांवर मुसंडी
-भाजपा 89, तर काँग्रेस 83 जागांवर पुढे; जेडीएसची 41 जागांवर मुसंडी
- भाजपा 87, काँग्रेस 83 जागांवर पुढे; जेडीएस 40 ठिकाणी आघाडीवर
- मुख्यमंत्री सिद्धारामय्या चांमुडेश्वरी मतदारसंघात 11 हजार मतांनी पिछाडीवर
- भाजपा 82, काँग्रेस 75 जागांवर पुढे; जेडीएस 36 मतदारसंघात आघाडीवर
- भाजपा आणि काँग्रेसची प्रत्येकी 73 जागांवर मुसंडी; जेडीएस 33 जागांवर पुढे
-
- भाजपाची मुसंडी; सत्ताधारी काँग्रेस पिछाडीवर
- एबीपी न्यूज आणि इंडिया टुडेच्या आकड्यांनुसार भाजपा 75 जागांवर पुढे
- काँग्रेस 52, भाजपा 46 जागांवर आघाडी; जेडीएस 23 मतदारसंघात पुढे
- मुख्यमंत्री सिद्धरामय्या चामुंडेश्वरीतून पिछाडीवर
- बेळगावात मतमोजणी अर्धा तास उशिरानं सुरू होणार
- भाजपा 40, तर काँग्रेस 35 जागांवर पुढे; जेडीएस 21 मतदारसंघांमध्ये आघाडीवर
- काँग्रेस-31, भाजपा 30 जागांवर आघाडीवर
- मध्य कर्नाटकात भाजपा पुढे, कोस्टल कर्नाटकात काँग्रेसची मुसंडी
- काँग्रेस- 27, भाजप- 23, जनता दल सेक्युलर-12 जागांवर आघाडीवर
- काँग्रेस- 21, तर भाजप 13 मतदारसंघांमध्ये आघाडीवर; जेडीएस 9 जागांवर आघाडीवर
- सकाळी ८ वाजता सुरू होणार मतमोजणी- कर्नाटक विधानसभेतील एकूण जागाः २२४ - बहुमताचा आकडाः ११३ - किती जागांवर झालं मतदान? - २२२ (जयनगर इथल्या भाजपा उमेदवाराचा मृत्यू झाल्यानं आणि राजराजेश्वरी येथे बनावट ओळखपत्र सापडल्यानं निवडणूक स्थगित) - भाजपाने लढवलेल्या जागा - २२२ - काँग्रेसने किती जागा लढवल्या? - २२० - जनता दल (ध) + बसपा - २१७ - एकूण उमेदवारः २,६०० - एकूण मतदारः ४.९६ कोटी- कर्नाटकात १९८५ पासून सलग दोन टर्म सत्ता कुठल्याच राजकीय पक्षाला मिळालेली नाही. - मुख्यमंत्री सिद्धरामय्या दोन जागांवरून लढताहेत निवडणूक - दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणारे पहिलेच मुख्यमंत्री - माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार- माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा जद(ध) 'किंगमेकर' ठरण्याचा एक्झिट पोलचा अंदाज
- वाढत्या तापमानामुळे मतदानाच्या वेळेत एक तासाने वाढ.
- प्रत्येक अधीक्षकाला शीघ्र कृती दलाचा वापर करण्याचे अधिकार.
- निमलष्करी दल, राखीव पोलीस दलही कर्नाटक पोलिसांच्या मदतीला.
- मतमोजणी केंद्रांच्या सुरक्षेचे प्रमुख पोलीस अधीक्षक किंवा उपायुक्त दर्जाचे अधिकारी.
- सोमवारी संध्याकाळपासूनच केंद्रांच्या परिसरात बंदी आदेश जारी.
- सर्वसामान्य नागरिकांसाठी मतमोजणी केंद्र आणि परिसरात प्रवेश नाही.
- कर्नाटकात २२४ मतदारसंघांमध्ये ४ कोटी ९८ लाख मतदार.
- कर्नाटकात २ कोटी ५२ लाख पुरुष, २ कोटी ४४ लाख महिला तर ४ हजार ५५२ तृतीयपंथी मतदार.