Karnataka Election Result: बेळगावमध्येही काँग्रेसची मुसंडी, १४ जागांवर घेतली आघाडी; महाराष्ट्र एकीकरण समितीला अपयश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 11:03 AM2023-05-13T11:03:00+5:302023-05-13T11:03:29+5:30
Karnataka Election Result: बेळगावमध्येही काँग्रेसला चांगलं यश मिळाल्याचं दिसून येत आहे.
Karnataka Election Result: कर्नाटकमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. बहुतमाचा आकडा पार करुन २२४ पैकी काँग्रेस ११५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपा ७३ आणि जेडीएस २९ जागांवर आघाडीवर आहे. काही ठिकाणी मात्र, भाजपा आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे बेळगावमध्येही काँग्रेसला चांगलं यश मिळाल्याचं दिसून येत आहे.
#KarnatakaPolls | As per the ECI, Congress crosses the halfway mark in early trends, leads in 115 constituencies, BJP ahead in 73 seats while JDS leads in 29 seats.#KarnatakaElectionResultspic.twitter.com/s2sMx1L4JS
— ANI (@ANI) May 13, 2023
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मतदारसंघ कुणाच्या पाठिशी उभे राहतात, यावर महाराष्ट्रात तर्क-वितर्क लढवले जात होते. मात्र सध्यातरी बेळगावमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. बेळगावमधील एकूण १८ जागांपैकी काँग्रेस १४ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा तीन जागांवर आघाडीवर आहे. बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीला सुरुवातीच्या कलांनूसर अपयश मिळाल्याचे दिसून येत आहे. सीमाभागातील मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाच्या नेत्यांनी प्रचारही केला होता. त्यासोबतच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या भागामध्ये प्रचारसभा घेतल्या होत्या.
दरम्यान, कर्नाटकमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी घेतली आहे. सुरुवातीच्या कलामध्ये काँग्रेसनं बहुमताचा आकडा गाठला आहे. यानंतर काँग्रेसच्या दिल्लीतील कार्यालयात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. फटाके ढोल वाजवून आनंद व्यक्त केला जात आहे. कर्नाटकमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. त्यानंतर काँग्रेसमधील घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना बंगळुरुमध्ये हलवण्यात येणार आहे. बहुमत न मिळाल्यास सर्व आमदारांना अज्ञातस्थळी हलवण्यात येणार आहे.
मोदी-शाह यांना जनतेनं नाकारलं- खासदार संजय राऊत
कर्नाटकातून देशाची मन की बात बाहेर पडत आहे. कर्नाटकच्या जनतेनं पंतप्रधान मोदी आणि मंत्री अमित शाह यांनी झिडकारलं असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं. कर्नाटकमध्ये जे झालं तेच २०२४ ला देशात होईल असेही राऊत म्हणाले.