शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

Karnataka Election Result: बेळगावमध्येही काँग्रेसची मुसंडी, १४ जागांवर घेतली आघाडी; महाराष्ट्र एकीकरण समितीला अपयश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 11:03 AM

Karnataka Election Result: बेळगावमध्येही काँग्रेसला चांगलं यश मिळाल्याचं दिसून येत आहे.

Karnataka Election Result: कर्नाटकमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. बहुतमाचा आकडा पार करुन २२४ पैकी काँग्रेस ११५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपा ७३ आणि जेडीएस २९ जागांवर आघाडीवर आहे. काही ठिकाणी मात्र, भाजपा आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे बेळगावमध्येही काँग्रेसला चांगलं यश मिळाल्याचं दिसून येत आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मतदारसंघ कुणाच्या पाठिशी उभे राहतात, यावर महाराष्ट्रात तर्क-वितर्क लढवले जात होते. मात्र सध्यातरी बेळगावमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. बेळगावमधील एकूण १८ जागांपैकी काँग्रेस १४ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा तीन जागांवर आघाडीवर आहे. बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीला सुरुवातीच्या कलांनूसर अपयश मिळाल्याचे दिसून येत आहे. सीमाभागातील मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाच्या नेत्यांनी प्रचारही केला होता. त्यासोबतच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या भागामध्ये प्रचारसभा घेतल्या होत्या. 

दरम्यान, कर्नाटकमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी घेतली आहे. सुरुवातीच्या कलामध्ये काँग्रेसनं बहुमताचा आकडा गाठला आहे. यानंतर काँग्रेसच्या दिल्लीतील कार्यालयात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. फटाके ढोल वाजवून आनंद व्यक्त केला जात आहे. कर्नाटकमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. त्यानंतर काँग्रेसमधील घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना बंगळुरुमध्ये हलवण्यात येणार आहे. बहुमत न मिळाल्यास सर्व आमदारांना अज्ञातस्थळी हलवण्यात येणार आहे.

मोदी-शाह यांना जनतेनं नाकारलं- खासदार संजय राऊत

कर्नाटकातून देशाची मन की बात बाहेर पडत आहे. कर्नाटकच्या जनतेनं पंतप्रधान मोदी आणि मंत्री अमित शाह यांनी झिडकारलं असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं. कर्नाटकमध्ये जे झालं तेच २०२४ ला देशात होईल असेही राऊत म्हणाले.  

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकbelgaonबेळगावcongressकाँग्रेसBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र