Karnataka election results 2018: पॅक अप सिद... कर्नाटकात काँग्रेसचे डझनभर मंत्री चितपट; सिद्धरामय्यांच्या कॅबिनेटचं पानिपत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2018 09:23 AM2018-05-16T09:23:45+5:302018-05-16T09:54:11+5:30

सिद्धरामय्या यांचा चामुंडेश्वरी मतदारसंघात पराभव

Karnataka election results 2018 more than 10 congress ministers taste defeat in polls | Karnataka election results 2018: पॅक अप सिद... कर्नाटकात काँग्रेसचे डझनभर मंत्री चितपट; सिद्धरामय्यांच्या कॅबिनेटचं पानिपत

Karnataka election results 2018: पॅक अप सिद... कर्नाटकात काँग्रेसचे डझनभर मंत्री चितपट; सिद्धरामय्यांच्या कॅबिनेटचं पानिपत

googlenewsNext

बेंगळुरु- सिद्धरामय्या यांच्या कर्नाटकमधील सरकारला मोठा फटका कालच्या निवडणुकांमुळे बसलेला दिसून आला. दक्षिण भारतातील एका महत्त्वाच्या राज्याची जबाबदारी आणि भिस्त त्यांच्यावर होती. सिद्धरामय्या त्यांच्या स्वतःच्या चामुंडेश्वरी या पारंपरिक मतदारसंघात पराभूत झाले आणि बदामीमध्ये अगदीच निसटत्या मतांनी विजयी झाले. मात्र इतर जागांचा विचार केल्यास त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकार्यांना पराभव स्वीकारावा लागल्याचे दिसून येईल.

सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळातील ए. मंजू  हे पशुसंवर्धन विकासमंत्री १०,६५३ मतांनी पराभूत झाले. माजी अबकारी विभाग मंत्री एच. वाय मेटी यांचा १५,९३४ मतांनी पराभव झाला आहे. बी. रामनाथ राय यांचा भाजपा उमेदवाराने १५,९७१ मतांनी पराभव केला आहे. ते सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात वन आणि पर्यावरण खाते सांभाळत होते. वैद्यकीय शिक्षणमंत्री एस.आर पाटील चक्क २१,२७१ इतक्या मोठ्या फरकाने पराभूत झाले आहेत. फलोत्पादन मंत्री एस एस मल्लिकार्जुन हे ४,०७१ मतांनी पराभूत झाले आहेत. खनिकर्म विभागाचे मंत्री विनय कुलकर्णी यांना २०,३४० मतांनी , समाजकल्याण मंत्री एच. अंजनेय यांना ३८,९४० मतांनी तर कामगार मंत्री संतोष एस लाड यांना २५ हजार ९९७ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. 

इतर पराभूत आजी- माजी मंत्री
एस. तंगडगी - लघू पाटबंधारे मंत्री- १४२२५ मतांनी पराभूत 
व्ही आर सरोके- माजी नगरविकासमंत्री ११,९१७ मतांनी पराभूत 
ए. जैन माजी मंत्री व आमदार २९,७९९ मतांनी पराभूत
के तिमप्पा महसुल मंत्री ८,०३९ मतांनी पराभूत 
रुद्राप्पा लमानी- वस्त्रोद्योगमंत्री ११,३०४ मतांनी पराजय 
टीबी जयचंद्र कायदा न्याय, मानवाधिकार विभागाचे मंत्री-१०,३६५ मतांनी पराभूत 
एच. सी. महादेवप्पा - सार्वजनिक बांधकाम मंत्री २८,४७८ मतांनी पराभूत 
उमाश्री- कन्नड भाषा आणि सांस्कृतिक विभाग- २०,८८९ मतांनी पराभूत 
के. रत्नाकर- प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री २१,९५५ मतांनी पराभव 
पी. मध्वराज- क्रीडा आणि मत्स्यसंवर्धन १२,०४४ मतांनी पराभूत 
बी. रायरेड्डी - उच्चशिक्षण मंत्री -१३,३१८ मतांनी पराभूत 
 

Web Title: Karnataka election results 2018 more than 10 congress ministers taste defeat in polls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.