शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
2
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
3
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने दिवाळीत दाखवली लेकीची पहिली झलक, ठेवलं हे नाव
4
कॅनडा-भारत तणावपूर्ण वातावरणात PM ट्रुडो यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, हिंदूंबद्दल म्हणाले...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: एकीकडे अब्दुल सत्तार यांना दणका, दुसरीकडे अरविंद सावंतांवर गुन्हा
6
भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट; चार दुकाने जळून खाक! मुंब्रा-शिळफाटा परिसरातील घटना
7
Post Office Time Deposit: पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये पैसे गुंतवलेत? करा फक्त १ काम, मिळेल मूळ रकमेपेक्षा दुप्पट रक्कम
8
'पाणी' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आदिनाथ म. कोठारे करणार 'या' चित्रपटाचं दिग्दर्शन
9
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
10
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
11
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
12
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
13
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
14
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
15
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचाही राज्यात धडाका 
17
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
18
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
19
सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ
20
२२ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या, कासारवडवलीतील घटना

Karnataka election results 2018: पॅक अप सिद... कर्नाटकात काँग्रेसचे डझनभर मंत्री चितपट; सिद्धरामय्यांच्या कॅबिनेटचं पानिपत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2018 9:23 AM

सिद्धरामय्या यांचा चामुंडेश्वरी मतदारसंघात पराभव

बेंगळुरु- सिद्धरामय्या यांच्या कर्नाटकमधील सरकारला मोठा फटका कालच्या निवडणुकांमुळे बसलेला दिसून आला. दक्षिण भारतातील एका महत्त्वाच्या राज्याची जबाबदारी आणि भिस्त त्यांच्यावर होती. सिद्धरामय्या त्यांच्या स्वतःच्या चामुंडेश्वरी या पारंपरिक मतदारसंघात पराभूत झाले आणि बदामीमध्ये अगदीच निसटत्या मतांनी विजयी झाले. मात्र इतर जागांचा विचार केल्यास त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकार्यांना पराभव स्वीकारावा लागल्याचे दिसून येईल.

सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळातील ए. मंजू  हे पशुसंवर्धन विकासमंत्री १०,६५३ मतांनी पराभूत झाले. माजी अबकारी विभाग मंत्री एच. वाय मेटी यांचा १५,९३४ मतांनी पराभव झाला आहे. बी. रामनाथ राय यांचा भाजपा उमेदवाराने १५,९७१ मतांनी पराभव केला आहे. ते सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात वन आणि पर्यावरण खाते सांभाळत होते. वैद्यकीय शिक्षणमंत्री एस.आर पाटील चक्क २१,२७१ इतक्या मोठ्या फरकाने पराभूत झाले आहेत. फलोत्पादन मंत्री एस एस मल्लिकार्जुन हे ४,०७१ मतांनी पराभूत झाले आहेत. खनिकर्म विभागाचे मंत्री विनय कुलकर्णी यांना २०,३४० मतांनी , समाजकल्याण मंत्री एच. अंजनेय यांना ३८,९४० मतांनी तर कामगार मंत्री संतोष एस लाड यांना २५ हजार ९९७ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. 

इतर पराभूत आजी- माजी मंत्रीएस. तंगडगी - लघू पाटबंधारे मंत्री- १४२२५ मतांनी पराभूत व्ही आर सरोके- माजी नगरविकासमंत्री ११,९१७ मतांनी पराभूत ए. जैन माजी मंत्री व आमदार २९,७९९ मतांनी पराभूतके तिमप्पा महसुल मंत्री ८,०३९ मतांनी पराभूत रुद्राप्पा लमानी- वस्त्रोद्योगमंत्री ११,३०४ मतांनी पराजय टीबी जयचंद्र कायदा न्याय, मानवाधिकार विभागाचे मंत्री-१०,३६५ मतांनी पराभूत एच. सी. महादेवप्पा - सार्वजनिक बांधकाम मंत्री २८,४७८ मतांनी पराभूत उमाश्री- कन्नड भाषा आणि सांस्कृतिक विभाग- २०,८८९ मतांनी पराभूत के. रत्नाकर- प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री २१,९५५ मतांनी पराभव पी. मध्वराज- क्रीडा आणि मत्स्यसंवर्धन १२,०४४ मतांनी पराभूत बी. रायरेड्डी - उच्चशिक्षण मंत्री -१३,३१८ मतांनी पराभूत  

टॅग्स :Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८congressकाँग्रेसBJPभाजपा