Karnataka Election Result 2018: काँग्रेस आघाडीवर तर भाजपकडूनही 'काँटे की टक्कर'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 01:26 PM2018-09-03T13:26:10+5:302018-09-03T13:29:01+5:30
Karnataka Municipal Election Results 2018: येथील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली आहे. त्यामध्ये काँग्रेसने...
बंगळुरू - कर्नाटकमधील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांसाठी 31 ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात आले होते. या निवडणुकांसाठी आज सकाळपासून निकालास सुरुवात झाली आहे. त्यामध्ये सद्यस्थितीनुसार काँग्रेसने आघाडी घेतली असून भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. कर्नाटकच्या 105 स्थानिक स्वराज संस्थांमधील निवडणुकांच्या 2664 जागांपैकी 2264 जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. तर भाजपनेही काँटे की टक्कर दिल्याचे दिसून येते.
येथील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली आहे. त्यामध्ये काँग्रेसने 846, भाजपने 788, जेडीएसने 307 जागांवर विजय मिळवला आहे. तर 277 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. राज्यातील म्हैसूर, शिवमोगा आणि तुमाकुरू या जिल्ह्यांमधील नगरपालिका, नगरपरिषद आणि नगर पंचायतींसाठी हे मतदान घेण्यात आले होते. या निवडणुकांसाठी 67.5 टक्के मतदान झाले आहे. दरम्यान, अद्यापही मतमोजणी सुरुच असून कदाचित उद्या सकाळपर्यंत अंतिम निकाल हाती येतील, असे एका संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. या निवडणुकांसाठी एकूण 8340 उमेदवार मैदानात उतरले होते. त्यामध्ये काँग्रेसकडून 2306, भाजपकडून 2203 आणि जनता दल सेल्युलरकडून 1397 उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत.