बेंगळुरू : कर्नाटकमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळं सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस-जेडीएसने सत्ता स्थापनेसाठी दावा केल्यानंतर आता भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपाल वजूभाई वाला यांनी आमंत्रण दिल्याचा दावा भाजपचे आमदार सुरेश कुमार यांनी केला आहे. त्यामुळे काँग्रेस-जेडीएसची सरकार स्थापन करण्याची स्वप्नं धुळीला मिळण्याची शक्यता आहे.
कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी भाजपला निमंत्रण देण्यात आले असून उद्या सकाळी 9.30 वाजता येडियुरप्पांचा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचा दावा आमदार सुरेश कुमार यांनी केला आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाला 21 मेपर्यंत मुदत देण्यात आल्याची माहिती आहे.
काल कर्नाटकाचा निकाल हाती आला. यामध्ये बहुमताचा 112 आकडा कोणालाही गाठता आला नाही. भाजप हा 104 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसला एकूण 78 आणि जेडीएस 38 जागा मिळाल्या आहेत. मात्र काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देऊन सत्ता स्थापन करण्यासाठी मोकळीक दिली होती. त्यामुळे काँग्रेस आणि जेडीएसकडे मिळून 116 आमदारांचं बळ आहे.
काँग्रेस-जेडीएसने घेतली राज्यपालांची भेट
काँग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची आज भेट घेतली. यावेळी जेडीएस आणि काँग्रेसनं बहुमत असल्याचा दावा करत 117 आमदारांच्या नावांची यादी राज्यपालांना सोपवली. जेडीएसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार एच डी कुमारस्वामी आणि काँग्रेसचे नेते हजर होते. यावेळी मात्र राज्यपालांनी सत्ता स्थापनेच्या निमंत्रणाबाबत कुठलंही आश्वासन दिलं...