कर्नाटकात प्रचारतोफा आज थंडावणार, सत्ता टिकवण्यासाठी भाजपची शक्ती पणाला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 06:07 AM2023-05-08T06:07:59+5:302023-05-08T06:08:47+5:30
एकहाती सत्तेसाठी काँग्रेस नेत्यांकडून कठोर परिश्रम
बंगळुरू : कर्नाटकातील १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा सोमवारी थंडावणार आहेत. तिन्ही प्रमुख राजकीय पक्ष - भाजप, काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) मतदारांना प्रचारसभांच्या माध्यमातून आकर्षित करण्याचा शेवटचा प्रयत्न सोमवारी करतील.
गेल्या काही दिवसांपासून सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या तोफा राज्यभर धडाडत आहेत. दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची राज्याची ३८ वर्षे जुनी परंपरा मोडीत काढण्यासाठी आणि दक्षिणेकडील बालेकिल्ला कायम ठेवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे, तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत स्वतःला मुख्य विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळवून देण्यासाठी काँग्रेस भाजपकडून सत्ता हिसकावून घेण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे.
‘डबल इंजिन’मध्ये कोणत्या इंजिनला किती कमिशन?
माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जेडीएस प्रचारात आपली सर्व शक्ती पणाला लावताना दिसला. त्यांना ‘किंगमेकर’ नव्हे तर ‘किंग’ बनून स्वबळावर सरकार स्थापन करण्याची
आशा आहे.
राष्ट्रीय विरुद्ध स्थानिक प्रश्न
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘डबल-इंजिन’ सरकार, राष्ट्रीय समस्या आणि योजना आणि केंद्र सरकारच्या यशाला केंद्रस्थानी ठेवून भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळली. काँग्रेसने मात्र मोठ्या प्रमाणावर स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित केले. सुरुवातीला स्थानिक नेत्यांनी प्रचार सांभाळला आणि नंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी प्रचार हातात घेतला. अखेरच्या टप्प्यात ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधीही सहभागी झाल्या.
काँग्रेसला सत्तेसह नवसंजीवनीची आशा
काँग्रेससाठी, भाजपकडून सत्ता हिसकावून घेणे हे मनोबल वाढवणारे आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या विरोधात मुख्य विरोधी पक्ष म्हणून आपले स्थान बळकट करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. कर्नाटक जिंकून मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांमध्ये या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या निवडणुकीसाठी पक्षाला नवसंजीवनी मिळेल, अशी काँग्रेसला अपेक्षा आहे.
पंतप्रधान मोदींचा प्रचाराचा धुरळा
२९ एप्रिलपासून गेल्या एका आठवड्यात मोदींनी प्रचाराचा धुरळा उडवला. आतापर्यंत त्यांनी १८ मेगा सार्वजनिक सभा आणि सहा रोड शो घेतले.
निवडणुकांच्या घोषणेपूर्वी मोदींनी अनेक