कर्नाटकात दारू, ड्रग्जसह पैशांचाही पाऊस; ३७५ कोटींचा ‘माल’ जप्त; ईडीने ताब्यात घेतली २८८ कोटींची मालमत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 11:18 AM2023-05-10T11:18:12+5:302023-05-10T11:19:15+5:30

राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) २८८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

karnataka election use money including alcohol, drugs 375 crore worth of 'goods' seized; ED seized property worth 288 crores | कर्नाटकात दारू, ड्रग्जसह पैशांचाही पाऊस; ३७५ कोटींचा ‘माल’ जप्त; ईडीने ताब्यात घेतली २८८ कोटींची मालमत्ता

कर्नाटकात दारू, ड्रग्जसह पैशांचाही पाऊस; ३७५ कोटींचा ‘माल’ जप्त; ईडीने ताब्यात घेतली २८८ कोटींची मालमत्ता

googlenewsNext

नवी दिल्ली / बंगळुरू : २०२४ च्या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून कर्नाटकची निवडणूक होत असून, त्यासाठी आज, बुधवारी मतदान होत आहे. या निवडणुकीत मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणात दारू, ड्रग्ज, पैसे देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मतदानापूर्वी अनेक तपास पथकांनी ३७५ कोटी रुपयांची दारू, ड्रग्ज आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. हे प्रमाण राज्यातील गेल्या विधानसभा निवडणुकीत जप्त केलेल्या साहित्याच्या चार पट अधिक असल्याचे निवडणूक आयोगाने मंगळवारी सांगितले. दुसरीकडे, राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) २८८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

इम्रान खान यांना अटक का?, शिवसेनेचा कोणाला टोला; सांगितलं सुडाचं राज'कारण'

दारूचा महापूर

निवडणूक आयोगाने ८१ विधानसभा जागांना ‘निवडणूक खर्चाच्या दृष्टिकोनातून संवेदनशील’ म्हणून जाहीर केले आहे.

कोलार जिल्ह्यातील बंगारापेट विधानसभेत तपास यंत्रनेने ४.०४ कोटी रुपये रोख जप्त केले आहेत. सर्व जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात दारू जप्त करण्यात आली असून, ती मतदारांना आकर्षित करण्यासाठी घेतली जात होती.

विषारी सापांपासून ते ‘विषकन्या’ आणि ‘नालायक पोरगा’

मतदानापूर्वी जवळपास महिनाभर चाललेल्या प्रचारादरम्यान ‘विषारी साप’, ‘विषकन्या’ आणि ‘नालायक पोरगा’ यांसारख्या टिप्पण्यांमुळे नेत्यांची घसरलेली पातळी दिसून आली. राजकारण्यांनी सावधगिरी आणि संयम न बाळगता अभद्र आणि अपमानास्पद भाषा वापरल्यामुळे प्रचार आणि निवडणुकीचे वातावरण बिघडले, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.

पंतप्रधानांच्या व्हिडीओ विरोधात काँग्रेसची तक्रार

आदर्श आचारसंहिता सुरू असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ संदेश तयार करून कर्नाटकातील जनतेला भावनिक साद घातला. यावरून काँग्रेस आक्रमक झाली असून, पंतप्रधानांचा हा व्हिडीओ आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे काँग्रेसने म्हटले. या प्रकरणात निवडणूक आयोगाने त्यांचे घटनात्मक कर्तव्य बजावत पंतप्रधानांवर कारवाई करण्याची विनंती काँग्रेसने केली.

हत्येचे आरोप चर्चेत

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हत्येचे आरोपही चर्चेत आले होते. चित्तपूरचे भाजपचे उमेदवार मणिकांत राठोड यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्याचा कट रचल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. काँग्रेसने संभाषणाचे एक ऑडिओ रेकॉर्डिंग जारी करत हा आरोप केला होता.

४० टक्के कमिशन

काँग्रेसने सत्ताधारी भाजपवर ‘४० टक्के कमिशनचे सरकार’ असे संबोधत हल्ला सुरूच ठेवला, तर पंतप्रधान मोदींनी राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाच्या काळात ८५ टक्के भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधत विरोधी पक्षावर जोरदार निशाणा साधला.

काँग्रेसच्या ‘हात’ या चिन्हाची ‘पंजा’शी तुलना करून ते म्हणाले की, ८५ टक्के लोकांचा वाटा हिसकावून घेणारा कोणता पंजा होता.

कोण काय म्हणाले होते?

चूक करू नका, मोदी हे विषारी सापासारखे : मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस अध्यक्ष

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी या विषकन्या : बसनगौडा पाटील यतनाळ, भाजप

अनुसूचित जाती, विशेषत: भटक्या लंबानी जमातींच्या अंतर्गत आरक्षणाबाबतच्या गोंधळामुळे मोदी हे नालायक मुलगा आहेत. : प्रयंक खरगे, उमेदवार, काँग्रेस

Web Title: karnataka election use money including alcohol, drugs 375 crore worth of 'goods' seized; ED seized property worth 288 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.