बेंगळुरू - कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे सुरुवातीचे दोन तास पूर्ण झाले असून, पहिल्या दोन तासांमध्ये आलेल्या कलांमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. मात्र मतमोजणीच्या उत्तरार्धात परिस्थिती बदलण्याची आशा काँग्रेस नेत्यांना आसून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी 11 साडे अकरा वाजेपर्यंत चित्र बदलण्याची शक्यता वर्तवली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना खरगे म्हणाले, "मतमोजणीच्या कलांमध्ये दुपारी 11 साडे अकरा वाजेपर्यंत बदल होईल, अशी अपेक्षा आहे. सध्या मी जनता दल (सेक्युलर) सोबत संभाव्य आघाडी करण्याची शक्यता चाचपण्यासाठी गुलाम नबी आझाद आणि अशोक गहलोत यांच्याशी चर्चा करण्यासाठी जात आहे."