Karnataka Elections 2023: कर्नाटकात विधानसभा निवडणुकीची तयारी जोराने सुरू आहे. एकीकडे सर्व पक्षांनी प्रचार सुरू केला आहे, तरदुसरीकडे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. या दरम्यान एका अपक्ष उमेदवाराच्या कृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. उमेदवारी अर्ज भरताना जमा करावयाच्या रकमेसाठी या उमेदवाराने सरकारी कार्यालयात नाण्यांचा डोंगर उभारला.
कर्नाटकातील यादगीर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार यंकप्पा यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी 10,000 रुपयांची अनामत रक्कम पूर्णपणे नाण्यांमध्ये भरली. 10 मे रोजी होणाऱ्या कर्नाटक निवडणुकीसाठी त्यांनी आपल्या मतदारसंघातील लोकांकडून पैसे गोळा केले. यंकप्पा यांनी आपले जीवन गावकऱ्यांसाठी समर्पित करण्याची शपथ घेतली.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी बुधवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी कर्नाटकातील हुबळी येथील आमदार अरविंद बेलाड यांच्या घरी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेतली. हावेरी जिल्ह्यातील शिगगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे बोम्मई आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 2008 पासून ते या जागेवर विजयी होत आहेत.