शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
2
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
3
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
4
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
5
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
6
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
7
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
8
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
9
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
10
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
11
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
12
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
13
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
14
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
15
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
16
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
17
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
18
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
19
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
20
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...

Karnataka Elections: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान शिव शंकरांप्रमाणे...'; ज्योतिरादित्य शिंदे यांचं काँग्रेसवर शरसंधान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2023 6:19 PM

"आपणा सर्वांना सोबत घेऊन कर्नाटकचा विकास करण्याचा भाजपचा संकल्प आहे."

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात करण्यात आलेल्या वक्तव्यावरून आणि बजरंग दलावर बंदी घालण्यासंदर्भात केल्या गेलेल्या भाष्यावरून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान नीळकंठ यांच्या प्रमाणे, विरोधकांची एकेक शिवी पिऊन देशाचा विकास केला असल्याचे ज्योतिरादित्य यांनी म्हटले आहे. ते बुधवारी (3 मे) कर्नाटकातीलनिवडणूक प्रचारादरम्यान बोलत होते.

शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, हे मला साप म्हणतात, पण भगवान शिव शंकरांच्या गळ्यात नाग देवता विराजमान होते, हे यांनी विसरू नये. ज्या पद्धतीने भगवान शिव शंकरांनी विषपाण केले आणि एक नवा अध्याय सुरू केला. त्याच पद्धतीने पंतप्रदानांनी विरोधकांच्या शिव्या पिऊन देशाला विकासाच्या पथावर अग्रेसर केले आहे. 

आणखी काय म्हणाले ज्योतिरादित्य? -काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर निशाणा साधताना ज्योतिरादित्य म्हणाले, ज्या देशद्रोही पीएफआयला काँग्रेस सरकारने नवी ऊर्जा दिली, त्या पीएफआयला तुरुंगात पाठवण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. आपणा सर्वांना सोबत घेऊन कर्नाटकचा विकास करण्याचा भाजपचा संकल्प आहे. तत्पूर्वी, काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दलाची तुलना पीएफआयसोबत करत, त्यावर बंदी घालू, असे म्हटले आहे.

खर्गे आणि त्यांच्या मुलाने नेकेले होते भाष्य - महत्वाचे म्हणजे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नुकतेच कर्नाटकातील एका निवडणूक सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विषारी साप म्हणून संबोधित केले होते. यानंतर त्यांनी, आपण पंतप्रधानांना साप म्हटले नव्हे तर, ते ज्या भाजप आणि आरएसएसच्या विचारधारेचे नेतृत्व करतात, त्या संदर्भात वक्तव्य केले होते. यानंतर त्यांचा मुलगा आणि माजी मंत्री प्रियांक खर्गे यांनीही पंतप्रधान मोदींबद्दल अपशब्द वापरले होते.

 

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेKarnatakकर्नाटकBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूक