मुंबई: कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांच्या धामधुमीत महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगावातील जागांचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार सध्या भाजपाने पाच जागांवर तर काँग्रेसने तीन जागांवर आघाडी घेतल्याचे दिसत आहे. तर महाराष्ट्राला अपेक्षा असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीची पाटी अद्याप कोरी आहे. बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण आणि खानापूर या चार जागांवर महाराष्ट्र एकीकरण समितीला यश मिळण्याची सर्वात मोठी शक्यता आहे. त्यापैकी दक्षिण बेळगावमध्ये भाजपाने आघाडी घेतली आहे. तर उर्वरित तीन जागांवर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार आघाडीवर आहेत.मात्र, याठिकाणची मतमोजणी उशीरा सुरू झाल्याने प्राथमिक कल हाती येण्यास वेळ लागत आहे. बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात 76 टक्के मतदान पार पडले आहे. मतदानाची टक्केवारी तुलनेने चांगली चांगली असल्याने निकालीची उत्सुकता वाढली आहे. या 18 मतदारसंघातून 203 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 184 पुरुष आणि 19 महिला उमेदवारांचा समावेश आहे. निवडणूक तोंडावर असताना महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये फूट पडली होती. बंडखोर उमेदवार अपक्ष उभे राहिल्याने एकीकरण समितीची मते विभागली गेली होती. आजच्या निकालात याचा स्पष्ट फटका बसताना दिसत आहे.
लाईव्ह अपडेटस्
* भाजपा 6 जागांवर आघाडी, काँग्रेस 5 तर महाराष्ट्र एकीकरण समितीची एका जागेवर आघाडी