नवी दिल्ली : कर्नाटकात लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या दोन जागांसाठी गेल्या शनिवारी पोटनिवडणूक झाली होती. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या पोटनिवडणुकीत पाच पैकी चार जागांवर काँग्रेस-जनता दल सेक्युलर (जेडीएस) आघाडीने विजय मिळविला आहे.
काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस आघाडीच्या विजयाची तुलना भारतीय संघाच्या कसोटी मालिका विजयाबरोबर केली आहे. पी. चिदंबरम यांनी याबाबत ट्विट केले आहे. ते म्हणाले, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ज्याप्रमाणे कसोटी मालिका जिंकतो, त्याचप्रमाणे कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस आघाडीने 4-1 कामगिरी केली आहे.
दरम्यान, बळ्ळारी लोकसभा मतदारसंघ आणि जामखांडी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर, मांडया लोकसभा आणि रामानागारा विधानसभा मतदारसंघातून जेडीएस उमेदवाराने विजय मिळवला आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसला आहे.
कर्नाटक विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या पत्नी अनिता यांनी रामनगर मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा 109137 मतांच्या फरकाने धुव्वा उडविला असून भाजपाचे एल. चंद्रशेखर यांचा पराभव केला आहे. तर भाजपाने शिमोगा राखले असून येडीयुराप्पांचे पुत्र राघवेंद्र 52148 मतांनी विजयी झाले आहेत. मंड्यामध्ये भाजपाचा मोठा पराभव झाला असून जेडीएस सव्वातीन लाख मतांनी जिंकली आहे.
जमखंडी विधानसभा मतदारसंघातीन काँग्रेसचे उमेदवार न्यामगौडा यांनी भाजपावर 32933 मतांनी आघाडी मिळविली असून जेडीएसच्या अनिता कुमारस्वामी यांनी रामनगर मतदारसंघातून 82928 मतांची भक्कम आघाडी मिळविली आहे. तर भाजपाचे बी वाय राघवेंद्र यांनी 36467 मतांनी शिमोगा लोकसभा मतदारसंघातून आघाडी घेतली आहे.
कर्नाटक विधानसभा, लोकसभा पोटनिवडणूक निकाल- जमखंडी विधानसभा - काँग्रेस उमेदवार-96968भाजप उमेदवार-57492अनंद न्यामगौड -:काँग्रेस उमेदवार 39476 मतांनी विजयी
- रामनगर विधानसभा काँग्रेस उमेदवार-1,14,874भाजप उमेदवार-14,628अनिता कुमारस्वामी -:(जनता दल +काँग्रेस )1 लाख 246 मतांनी विजयी
- बळ्ळारी - लोकसभाकाँग्रेस उमेदवार-5,15,179भाजप उमेदवार-3,16,872उग्रप्पा काँग्रेस उमेदवार 1 लाख 98 हजार 308 मतांनी विजयी
- मांड्या लोकसभाकाँग्रेस उमेदवार-5,69,302भाजप उमेदवार-2,44,377शिवरमगौड -: (जनता दल +काँग्रेस )3लाख 25हजार मतांनी विजयी