शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मी बाबांसोबतच वाढदिवस साजरा करणार...! वडिलांचा कोरोनाने मृत्यू, मुलीनं कबरेजवळ कापला केक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2021 6:03 PM

वडिलांच्या समाधीसमोर उभे राहून स्पंदना कोनासागर हिने वडिलांना श्रद्धांजली वाहिली. ती म्हणाली, 'मला असे वाटते, की माझे वडील अजूनही आजूबाजूलाच आहेत आणि ते या विशेष दिवशी मला पाहत आशीर्वाद देत आहेत...'

कोप्पल - तीन महिन्यांपूर्वी, चिमुकल्या स्पंदनाच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले. तिचे वडील तिचा वाढदिवस अत्यंत थाटात साजरा करत. मात्र यावेळी, ते तिच्या वाढदिवसासाठी तिच्यासोबत नव्हते. यामुळे स्पंदनाने तिचा वाढदिवस वडिलांच्या कबरीजवळ जाऊन साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या आठव्या वाढदिवसाचा केक कापला. ही भावूक करणारी घटना आहे कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यातील. येथील कुश्तगी तालुक्यात, स्पंदनाने सुमारे डझनभर कुटुंबीयांना सोबत घेऊन वडिलांच्या कबरेजवळ (थडगे) गेली आणि केक कापून वाढदिवस साजरा केला. (karnataka girl celebrate her eight birthday near father mausoleum in Koppal district)

वडिलांना वाहिली श्रद्धांजली -वडिलांच्या समाधीसमोर उभे राहून स्पंदना कोनासागर हिने वडिलांना श्रद्धांजली वाहिली. ती म्हणाली, 'मला असे वाटते, की माझे वडील अजूनही आजूबाजूलाच आहेत आणि ते या विशेष दिवशी मला पाहत आशीर्वाद देत आहेत. माझ्या आयुष्यातील ही एक संस्मरणीय घटना आहे आणि मी येथे प्रत्येक विशेष प्रसंगी माझ्या वडिलांचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे येत जाईन.

'राजकीय रॅलीदरम्यान झाला कोरोना' -डोळ्यातील अश्रू पुसत स्पंदनाची आई रुपा म्हणाल्या, "मी मे महिन्यात माझे पती महेश कोनासागर यांना गमावले. ते समाजिक कार्यकर्ता होते. एका राजकीय सभेत सहभागी झाल्यानंतर त्यांना ताप आला होता. नंतर, डॉक्टरांनी ते कोविड पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. 13 मे रोजी त्यांचे निधन झाले. आमच्या शेतातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

CoronaVirus: देशात नव्या रुग्णांची दोन महिन्यांतील सर्वाधिक संख्या; केरळसह महाराष्ट्रात सर्वांत जास्त रुग्ण

वडिलांची खूप आठवण येते -स्पंदना ही रुपा आणि महेश यांची एकुलती एक मुलगी आहे. ती म्हणाली, वडिल माझा वाढदिवस नेहमीच थाटात साजरा करत असत. 'जेव्हा, आईने त्याच्या मृत्यूसंदर्भात मला सांगितले, तेव्हा माझा विश्वासच बसत नव्हता. मला त्यांची खूप आठवण येते.'

रूपा म्हणाल्या, स्पंदनाला या सर्व घटनेतून सावरायला बराच वेळ लागला. जेव्हा आम्ही तिचा आठवा वाढदिवस घरी साजरा करायचे ठरवले, तेव्हा ती म्हणाली, की तिला तिच्या वडिलांच्या समाधीस्थळी जाऊन वाढदिवस साजरा करायची इच्छा आहे. यानंतर आम्ही तिथेच तिचा वाढदिवस साजरा केला.

टॅग्स :Karnatakकर्नाटकcorona virusकोरोना वायरस बातम्या