शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कर्नाटक सरकार सोमवारपर्यंत तरले; राज्यपालांचे आदेश पुन्हा टोलविले!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 6:44 AM

राज्यपाल वजुभाई वाला यांनी विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यासाठी दोन दिवसांत तीन डेडलाइन देऊनही कर्नाटकाच्या विश्वासमताचे घोंगडे सोमवारपर्यंत भिजत राहिले.

बंगळुरू : राज्यपाल वजुभाई वाला यांनी विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यासाठी दोन दिवसांत तीन डेडलाइन देऊनही कर्नाटकाच्या विश्वासमताचे घोंगडे सोमवारपर्यंत भिजत राहिले. दिवसभरातील नाट्यमय घडामोडींनंतर शुक्रवारी रात्री विधानसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले.राज्यपालांना विधानसभाध्यक्षांना आदेश देण्याचा अधिकारच नाही, असा दावा करत मुख्यमंत्री कुमारस्वामी व काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी गुरुवारची डेडलाइन देण्यात आली होती. मात्र, विधानसभाध्यक्ष के. आर. रमेशकुमार चर्चा पूर्ण झाल्याशिवाय विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेतले जाऊ शकत नाही, हे कारण पुढे करून गुरुवारी रात्री कामकाज स्थगित केले होते. गुरुवारी रात्री भाजपच्या काही आमदारांनी विधानसभेतच ठिय्या मांडला. तेथेच रात्र काढली, पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. अखेर राज्यपाल वाला यांनी शुक्रवारी दुपारी दीड वाजेपर्यंत मतदान घेण्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले, पण विधानसभेत शुक्रवारी दुपारी दीड वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करता न आल्याने, याच दिवशी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करावे, असे दुसरे पत्र कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना पाठविले. राज्यपालांनी दिलेल्या पहिल्या मुदतीकडे कुमारस्वामींनी दुर्लक्ष केले. आपल्या दुसऱ्या पत्रात वाला यांनी म्हटले आहे की,राज्य सरकारचे बहुमत सिद्ध करण्याच्या प्रयत्नांत घोडेबाजार होण्याचीशक्यता असल्याच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी बहुमत सिद्ध करण्याची प्रक्रिया शुक्रवारीच पार पडणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी विधानसभेत म्हणाले की, राज्यपालांकडून मला दुसरे प्रेमपत्र आले आहे. आमदार राजीनामे देत होते त्यावेळी चाललेल्या घोडेबाजाराकडे राज्यपालांनी का लक्ष दिले नाही असा सवालही कुमारस्वामी यांनीविचारला.कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याची तक्रार घेऊन मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी पाठविलेल्या पत्र तसेच सरकारला दिलेल्या मुदतीलाच कुमारस्वामी यांनी आक्षेप घेतला आहे. विधानसभा अध्यक्षांना राज्यपालांनी आदेश देणे हे सर्वोच्च न्यायालयाने आधीच्या अशा प्रकरणांमध्ये दिलेल्या निकालांच्या विरोधात आहे असे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.कर्नाटकच्या बंडखोर १५ आमदारांवर विधानसभेत हजर राहाण्यासाठी दडपण आणता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने १७ जुलै रोजी दिलेल्या निकालात म्हटले होते. त्याबद्दलही कुमारस्वामी तसेच कर्नाटक प्रदेश काँग्रेसने या न्यायालयाकडे दाद मागितली आहे. या निकालामुळे आमदारांना विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी उपस्थित राहाण्याबाबत व्हीप काढण्यात अडथळे येत आहेत असे मुख्यमंत्री व काँग्रेसने आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे.एकाही आमदाराने संरक्षण मागितले नाही : रमेशकुमारएकाही आमदाराने माझ्याकडे संरक्षण मागितलेले नाही असे कर्नाटकचे विधानसभाध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी म्हटले आहे. कुमारस्वामी सरकार पाडण्यासाठी काही जणांनी बंडखोर आमदारांना आपल्या ताब्यात ठेवले असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. कर्नाटक विधानसभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एच. के. पाटील यांनी हा शुक्रवारी हा मुद्दा उपस्थित केला होता.>राज्यपाल आदेश देऊ शकतात : घटनातज्ज्ञविधानसभाध्यक्षांना राज्यपाल आदेश देऊ शकतात का, या विषयावर घटनातज्ज्ञांनी वेगवेगळी मते व्यक्त केली आहेत. लोकसभेचे माजी जनरल सेक्रेटरी सुभाष कश्यप यांनी म्हटले आहे की, राज्यघटनेच्या १७५व्या कलमातील तरतुदींनुसार विधिमंडळाला आदेश देण्याचा राज्यपालांना अधिकार आहे. त्यांच्या आदेशाचे पालन करणे विधिमंडळाला बंधनकारक आहे.विधेयक मंजुरीविना पडून असल्यास सभागृहाला राज्यपाल सूचना करू शकतात. मात्र, बहुमत सिद्ध करण्यासाठीची प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश राज्यपाल वजुभाई वाला यांनी कर्नाटकच्या विधानसभा अध्यक्षांना देऊन वेगळाच पायंडा पाडला आहे, असे लोकसभेचे माजी सचिव पी. डी. टी. आचार्य यांनी म्हटले आहे.

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीKarnatak Politicsकर्नाटक राजकारण