ऑनलाइन लोकमत
कर्नाटक, दि. ८ - चार महिन्यांच्या बंदीनंतर कर्नाटक सरकार बच्चेकंपनीच्या आवडत्या मॅगी नूडल्सवरील बंदी उठवण्याचा विचार करत आहे. लीड व मोनोसोडियम ग्लुटामेटचे प्रमाण मर्यादेत असल्यामुळे बंदी उठवण्याचा विचार होत असल्याचे आरोग्यमंत्री यु.टी खादेर यांनी म्हटले आहे. लोकांचे आरोग्य धोक्यात जाऊ नये यासाठी फूड सेफ्टी स्टॅंडर्ड ऍथॉरिटी ऑफ इंडियाने मॅगी नूडल्यच्या निर्मीती आणि विक्रिवर बंदी घातली होती. पण कर्नाटक सरकारने राज्यातील प्रयोगशाळांच्या तपासणीत हानीकारक घटक आढळले नसल्याने राज्यातील मॅगीवरील बंदी उठवण्याचा विचार करत असल्याचे सागिंतले.
मॅगीमध्ये शिशाचे अंश आढळून आल्याने त्यावर देशभरात बंदी घालण्यात आली आहे. वादग्रस्त ठरलेल्या मॅगीची कोलकाता येथील प्रयोगशाळेत तपासणी केली असता. आवश्यकतेपक्षा अधिक लीड व मोनोसोडियम ग्लुटामेटचे प्रमाण आढळून आल्याचा अहवाल देण्यात आला होता. त्यामुळे त्याची पुन्हा तपासणी करण्यात येईल. काही झाले तरी सकारात्मक अहवाल आल्यास योग्य निर्णय घेण्यात येईल. जनतेचे आरोग्यहित महत्वाचे असल्याने स्पष्ट अहवाल येईपर्यंत मॅगी उत्पादनावरील बंदी सरकार उठविणार नाही, असे यु.टी खादेर त्यांनी स्पष्ट केले.