हरीश गुप्तानवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या कर्नाटक व गुजरात राज्याचे मुख्यमंत्री अनुक्रमे बी.एस. येदियुरप्पा आणि विजय रूपानी यांच्याभोवती वादळ घोंघावताना दिसत आहेत. त्याची कारणे मात्र भिन्न आहेत. पक्षश्रेष्ठींकडे या दोघांबद्दल पक्षातूनच अनेक प्रतिकूल अहवाल गेलेले असल्यामुळे त्यांचे भवितव्य अनिश्चित बनले आहे. बी.एस. येदियुरप्पा हे पक्षातील लोकांनी केलेल्या अनेक प्रकारच्या आरोपांना तोंड देत आहेत, तर विजय रूपानी यांच्यावर ते कामकाज चालवण्यात अकार्यक्षम असल्याची टीका होत आहे. कर्नाटक व गुजरातमध्ये तीन नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर त्यांच्या मुख्यमंत्र्यांचे भवितव्य ठरेल. कर्नाटकमध्येही विधानसभेच्या दोन जागांसाठी ३ नोव्हेंबरला पोटनिवडणूक होत आहे. येदियुरप्पा हे आताच ७७ वर्षांचे होऊन गेले आहेत. ७५ वर्षे झाल्यावर कोणीही सक्रिय पद धारण करू नये, या पक्षाच्या धोरणाचे ते पालन करणार असल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री गोविंद एम. कारजोल यांच्या नावावर जवळपास एकमत झाले आहे.
उद्योगमंत्री मनसुख भाई मांडविया यांचे नाव चर्चेतगुजरातमध्ये काँग्रेसच्या विद्यमान आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. या आठही जागा जिंकणे हे रुपानी यांच्यासमोरील आव्हान आहे आणि त्या जिंकल्यानंतरही ते पदावर राहतीलच याची खात्री नाही. २०२२ मध्ये राज्यात विधानसभा निवडणूक आहे व पक्षाच्या नेतृत्वाला त्यांच्या नेतृत्वाखाली राज्य हाती राहीलच याची हमी नाही. मुख्यमंत्रीपदासाठी जहाज उद्योगमंत्री मनसुख भाई मांडविया यांचे नाव चर्चेत आहे.