शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

गुजरात काँग्रेसचे आमदार थांबलेल्या रिसॉर्टवर आयकर विभागाचा छापा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2017 9:28 AM

बुधवारी सकाळी आयकर विभागाने कर्नाटकचे ऊर्जा मंत्री डीके शिवकुमार यांच्या घरावर छापा टाकला

ठळक मुद्देबुधवारी सकाळी आयकर विभागाने कर्नाटकचे ऊर्जा मंत्री डी.के शिवकुमार यांच्या घरावर छापा टाकलागुजरातमधील काँग्रेसच्या 44 आमदारांना ज्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं आहे त्या रिसॉर्टवरही आयकर विभागाने छापेमारी केली आहे. बुधवारी सकाळी सात वाजता आयकर विभागाने ही छापेमारी केली आहे

नवी दिल्ली, दि. 2-  बुधवारी सकाळी आयकर विभागाने कर्नाटकचे ऊर्जा मंत्री डीके शिवकुमार यांच्या घरावर छापा टाकला. तसंच गुजरातमधील काँग्रेसच्या 44 आमदारांना ज्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं आहे त्या रिसॉर्टवरही आयकर विभागाने छापेमारी केली आहे. बुधवारी सकाळी सात वाजता आयकर विभागाने ही छापेमारी केली आहे. गुजरातमधील काँग्रेसचे 44 आमदार रिसॉर्टमध्ये असताना ऊर्जामंत्री डीके शिवकुमार त्यांचे इनचार्ज होते. 8 ऑगस्ट रोजी होणाऱ्या गुजरात राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील गळती थांबविण्यासाठी या 44 आमदारांना बंगळुरूतील रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं होतं. भाजपने सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचं मत काँग्रेसकडून व्यक्त केलं जातं आहे. ईगलटन रिसॉर्टकडून जर काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील, तर कारवाई योग्य असल्याचं भाजपचं म्हणणं आहे. 

आयकर विभागाने डी.के शिवकुमार, डीके सुरेश आणि काँग्रेसचे विधानपरिषदेचे सदस्य एस रवि यांच्या घरावर छापे टाकले आहेत. काँग्रेस पक्षाच्या जवळचे समजले जाणारे डीके शिवकुमार आणि डीके सुरेश हे त्या भागात डीके ब्रदर्स नावाने प्रसिद्ध आहे. आयकर विभागाने कारवाईचा भाग म्हणून ईगलटन रिसॉर्टवरही धाड टाकली. ईगलटन रिसॉर्ट शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बिदादी इंडस्ट्रिअल एरियात आहे. या रिसॉर्टमध्ये एका खोलीचं एका दिवसाचं भाड दहा हजार रूपये आहे. तसंच या भागात अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांची कार्यालयं आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार डीके सुरेश यांनी त्या रिसॉर्टमध्ये काँग्रेसच्या 44 आमदारांसाठी प्रत्येक प्रकारची सुविधा उपलब्ध केली होती. तसंच इतर सुविधांसाठी त्यांनी एस रवि यांची मदत घेतली होती.  

कोण आहेत डीके ब्रदर्स?डीके शिवकुमार हे कर्नाटक सरकारमध्ये ऊर्जा मंत्री पदावर आहेत. जर डीके सुरेश हे बंगळुरू ग्रामीण मतदारसंघाचे खासदार आहेत. ज्या भागात काँग्रेसच्या 44 आमदारांना ठेवण्यात आलं होतं, तो भाग डीके सुरेश यांच्या मतदारसंघात येतो. अनेक राजकीय जाणकार डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानतात. गेल्या निवडणुकीत जेव्हा काँग्रेसने या भागात स्पष्ट बहुमत मिळवलं तेव्हा शिवकुमार कनकपुरा भागातून एक लाखपेक्षा जास्त मतांनी निवडून आले होते.  

44 आमदारांना बंगळुरूला हलवलंगुजरातमध्ये ८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या ४४ आमदारांना भाजपाच्या ‘शिकारी’पासून वाचविण्यासाठी बंगळुरूत हलविलं. काँग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामा दिला असून, त्यातील तीन भाजपात दाखल झाले आहेत.काँग्रेसचे नेते अहमद पटेल गुजरातमधून राज्यसभा निवडणूक लढवीत आहेत. पक्षाच्या ५७ पैकी ६ आमदारांनी राजीनामा दिल्याने संकट उभे ठाकले आहे. काँग्रेसचे महासचिव निशित व्यास म्हणाले की, ४४ आमदारांना बंगळुुरूला हलविले आहे. व्यास या आमदारांसोबत आहेत. सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले आहे. या आमदारांना धमक्या दिल्या जात आहेत, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी काँग्रेसचा हा आरोप खोडून काढताना हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. आमचा याच्याशी संबंध नाही, असा दावा केला.