कर्नाटकात दोन महिला IAS-IPS अधिकाऱ्यांच्या वादामुळे कर्नाटक प्रशासन हादरले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांनी काल एकमेकींविरोधात आरोप केले. या आरोपानंतर प्रशासनाने दोन्ही अधिकाऱ्यांची ट्रान्फर केली. आयपीएस अधिकारी डी रुपा मौदगील आणि आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी यांच्यात सोशल मीडियावर फोटो शेअर केल्याच्या कारणावरुन वाद सुरू आहेत.
डी रूपा यांचे पती आयएएस अधिकारी मुनीष मौदगील यांची प्रचार विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डी रूपा या राज्य हस्तकला विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि रोहिणी सिंधुरी या हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मादाय एंडॉवमेंट विभागाच्या आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. आदल्या दिवशी राज्याचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी दोन्ही अधिकाऱ्यांच्या “वाईट वर्तणुकीबाबत” कारवाईचा इशारा दिला होता.
या कारवाईवरुन कर्नाटकचे गृहमंत्री ज्ञानेंद्र यांनी प्रतिक्रिया दिली.'आम्ही गप्प बसलेले नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असंही ते म्हणाले होते. याय दोन्ही अधिकाऱ्यांचे त्यांचे वैयक्तिक मुद्दे काहीही असोत, पण मीडियासमोर येणे आणि असे वागणे योग्य नाही, असंही गृहमंत्र्यांनी म्हणाले.
डी रूपा यांनी रोहिणी सिंधुरी यांचे खासगी फोटो फेसबुकवर शेअर केल्यावर रविवारी दोन अधिकाऱ्यांमधील वाद वाढला. रोहिणी सिंधुरी यांनी पुरुष आयएएस अधिकाऱ्यांना फोटो पाठवून सेवा आचार नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा केला. डी रूपा यांनी आरोप केला आहे की, सिंधुरी यांनी २०२१ आणि २०२२ मध्ये त्यांचे फोटो तीन अधिकाऱ्यांसोबत शेअर केले होते.
एक दिवस आधी डी रूपा यांनी सिंधुरी यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपांची एक लांबलचक यादी जाहीर केली होती. डी रूपा यांनी दावा केला की त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि मुख्य सचिव वंदिता शर्मा यांच्याकडेही तक्रार केली होती.
हे आरोप निराधार असल्याचे सांगून सिंधुरी म्हणाल्या की, एका जबाबदार पदावर असलेल्या रुपा वैयक्तिक द्वेषातून आपल्याविरुद्ध अशा कमेंट करत आहेत आणि त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्यासारखे वागत आहेत.
अग्निपथच्या भरती नियमांमध्ये मोठा बदल, आता ITI-पॉलिटेक्निक उत्तीर्णही करू शकणार अर्ज
'माझी बदनामी करण्यासाठी त्यांनी सोशल मीडियावरून फोटो आणि माझ्या व्हॉट्सअॅप स्टेटसचे स्क्रीनशॉट घेतल्याचे रोहिणी सिंधुरी यांनी सांगितले. मी हे फोटो काही अधिकाऱ्यांना पाठवल्याचा आरोप त्यांनी केला असल्याने, मी त्यांना त्यांची नावे जाहीर करण्याची विनंती करतो. मानसिक आजार ही मोठी समस्या आहे. यासाठी औषधोपचार आणि समुपदेशन आवश्यक आहे. जेव्हा जबाबदार पदावरील लोकांवर त्याचा परिणाम होतो, तेव्हा ते आणखी धोकादायक बनते, असंही सिंधुरी म्हणाल्या.