बंगळुरू- कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी सुरु असलेल्या प्रचारामध्ये आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापत चालले आहे. विशेषतः मुख्यमंत्री सि्दधरामय्या आणि माजी मुख्यमंत्री व जेडीएस नेते कुमारस्वामी यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सर्वच मतदारांचे लक्ष वेधून घेत आहे. बेळगाव येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कुमारस्वामींवर पुन्हा एकदा थेट शाब्दिक हल्ला केला आहे.भाजपाचे अध्यक्ष अमित शाह आणि कुमारस्वामी हे दोघेही एकाच विमानातून दिल्लीला गेले आणि तेथे अनेक राजकीय नेत्यांना भेटले असा आरोप सि्दधरामय्या यांनी केला आहे. या प्रवासाचे आणि नेत्यांच्या भेटीचे माझ्याकडे पुरावे असून योग्यवेळी आपण ते प्रसिद्ध करु असेही सिद्धरामय्या यांनी सांगितले आहे.तर सिद्धरामय्यांचा दावा फेटाळताना कुमारस्वामी म्हणाले, मी कशाला शाह यांना भेटू, पुरावे प्रसिद्ध करण्यापासून त्यांना कोणी रोखले आहे. सिद्धरामय्यांच्या या दाव्यानंतर कुमारस्वामी आणि शाह यांच्या बंगळुरु ते दिल्ली कथित विमानप्रवासाची तिकिटे प्रसिद्ध झाली असून त्याची सत्यता पडताळण्यात आलेली नाही. अमित शाह यांनीही मुख्यमंत्र्यांचा दावा फेटाळला असून हे विधान सत्य नाही असे सांगितले. मी कुमारस्वामींना भेटलेलो नाही असे त्यांनी सांगितले.
2019ची निवडणूक लढवणार नाही- देवेगौडा2019 साली आपण निवडणूक लढवणार नसल्याचे एच. डी. देवेगौडा यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले,'' मी पुढील वर्षी निवडणूक लढवायचे नसल्याचे ठरवले आहे. काँग्रेस आणि भाजपा नसलेली आघाडी तयार करणे अत्यंत अवघड आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. मी आता एक ज्येष्ठ म्हणून सल्ला देईन पण कोणतीही सक्रीय भूमिका घेणं मला शक्य नाही. माझी तब्येत चांगली नाही आणि जर पूर्ण न्याय देता येत नसेल तोपर्यंत मला कोणतंही पद नको आहे ." देवेगौडा आणि बहुजन समाजवादी पक्ष यांची कर्नाटक निवडणुकीसाठी मैत्री झालेली आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन स