मंगळुरू - कर्नाटकहिंदू महासभेचे सचिव धर्मेंद्र यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि भाजपसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. धर्मेंद्र म्हणाले, सत्ताधारी भाजपने म्हैसूरमधील प्राचीन मंदिर पाडण्याची परवानगी देऊन हिंदूंच्या पाठीत सुरा खुपसला आहे. एवढेच नाही तर, हिंदूंवरील हल्ल्यांसाठी गांधीजींना मारणे शक्य होते, तर तुम्ही काय आहात, असेही धर्मेंद्र यांनी म्हटले आहे. पण, पोलिसांनी आता त्यांना अटक केली आहे. (Karnataka Mangalore police have arrested hindu mahasabha leader dharmendra for threatening to chief minister)
मंगळुरू पोलिसांनी धर्मेंद्र यांना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना धमकी दिल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. धर्मेंद्र यांच्याविरोधात खुद्द हिंदू महासभेच्या प्रदेशाध्यक्षांनीच तक्रार दाखल केली होती. तसेच पक्षाने त्यांना 2018 मध्येच काढून टाकले असल्याचा दावाही हिंदू महासभेने केला आहे.
भाजपने हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसला -धर्मेंद्र म्हणाले की, सत्ताधारी भाजपने म्हैसूरूमधील प्राचीन मंदिर पाडण्याची परवानगी देऊन हिंदूंच्या पाठीत सुरा भोसकला आहे आणि आता या लढाईत संघ परिवाराचा वापर करून ते आपले कृत्य लपविण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढेच नाही, तर मंदिर पाडण्याविरोधात संघाच्या संघटनांची लढाई हा भाजप सरकारचे अपयश लपविण्याचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
मंदिरांवरील हल्ले सुरूच विराहिले, तर कणारहित सरकारला सोडणार नाही -धर्मेंद्र म्हणाले, भाजप सरकारला विरोध करणाऱ्या हिंदू संघटनांनी भविष्यात भाजपला पाठिंबा न देण्याची उघड भूमिका घ्यायला हवी. जर मंदिरांवरील हल्ले सुरूच राहिले, तर हिंदू महासभा भाजप आणि राज्यातील कणा विरहित सरकारला सोडणार नाही.