शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

...म्हणून कर्नाटकच्या मंत्र्यानं खासदारांना वाटले 1 लाखाचे आयफोन एक्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 1:31 PM

कर्नाटकच्या जलसंपदा मंत्र्यांकडून सर्व खासदारांना आयफोन एक्स गिफ्ट

बंगळुरु: कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी स्वत:च्या कामाला तपस्या म्हणत असताना त्यांचे मंत्री मात्र लाखो रुपयांचे स्मार्टफोन 'गिफ्ट' म्हणून वाटत आहेत. कर्नाटक सरकारचे जलसंपदा मंत्री डी. के. शिवकुमार यांनी मंगळवारी कावेरी नदीच्या पाणी वाटप प्रश्नावर राज्याच्या खासदारांची बैठक घेतली. यावेळी बैठकीला उपस्थित असणाऱ्या 38 खासदारांना भेट म्हणून आयफोन एक्स देण्यात आले. या फोनची किंमत तब्बल 1 लाख रुपये आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत लोकसभेच्या 26 (बी. एस. येडियुरप्पा आणि बी. श्रीरामुलु यांना सोडून) आणि राज्यसभेच्या 12 खासदारांना आयफोन एक्स (256 जीबी) भेट म्हणून देण्यात आले. याशिवाय खासदारांना लेदरची बॅगदेखील देण्यात आली. या बॅगची किंमत 5 हजार रुपये इतकी आहे. मात्र भाजपाच्या 18 खासदारांनी या भेटवस्तू स्वीकारलेल्या नाहीत. या महागड्या भेटवस्तूंवर भाजपानं कर्नाटक सरकारवर निशाणा साधला आहे. 'कावेरी मुद्यावर चर्चा करण्यासाठी सर्व खासदारांना चर्चेला बोलावल्याबद्दल मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा आभारी आहे. मात्र अशा महागड्या भेटवस्तू खासदारांना का दिल्या जात आहेत? सत्तासंचलनाला तुम्ही तपस्या म्हणता, कर्मचाऱ्यांना वेतन दिलं जात नाही आणि तुम्ही जनतेच्या पैशाचा वापर महागड्या भेटवस्तू देण्यासाठी करत आहात. मी तुम्हाला भेटवस्तू परत करत आहे,' असं ट्विट भाजपाचे खासदार राजीव चंद्रशेखर यांनी केलं आहे. जलसंपदा मंत्री शिवकुमार यांनी मात्र त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. जलसंपदा विभागानं आयफोन एक्सची खरेदी केलेली नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. 'कावेरी मुद्याशी संबंधित कागदपत्रं खासदारांना एक बॅगमधून देण्यात आली होती. आयफोनची भेट माझ्याकडून खासदारांना देण्यात आली. तो माझा निर्णय होता. ही भेट खासगी स्वरुपाची होती,' असं शिवकुमार यांनी म्हटलं. 

टॅग्स :Apple iPhone Xअ‍ॅपल आयफोन XKarnatakकर्नाटक