नवी दिल्ली : कर्नाटकामध्ये कोणता पक्ष सरकार स्थापन करणार याचा निर्णय 15 मे रोजी होईल. पण त्यापूर्वीच काँग्रेससाठी खूशखबर आली आहे. लोकनीती-सीएसडीएस आणि एबीपी न्यूजच्या सर्वेनुसार या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. पण कोणत्याही पक्षाला एकहाती सरकार स्थापन करता येणार नाही. मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांच्या कामकाजावर नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे. या सर्वेनुसार काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. काँग्रेसला 92 ते 102 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भाजपा 79 ते 89 जागा तर जेडीएसला 32 ते 42 जागा मिळू शकतात. काँग्रेस पक्षाला 38 टक्के, भाजप 33 टक्के आणि जेडीएस+ 22 टक्के मते मिळतील असा अंदाज या सर्वेमध्ये आला आहे.
कर्नाटकात 12 मे रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी या सर्वेद्वारे कर्नाटकातील जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 27 एप्रिल ते 3 मे दरम्यान हा सर्व्हे करण्यात आला. 56 विधानसभा मतदारसंघांमधील 244 बूथवर जाऊन 4 हजार 929 मतदारांचं मत जाणून घेण्यात आलं.
मोदी सरकारचं कामकाज कसं आहे?खुप चांगलं : 23 टक्केचांगलं : 45 टक्केवाईट : 16 टक्केअत्यंत वाईट : 12 टक्के
कर्नाटकातील सिद्धरमैय्या सरकारचं काम कसं आहे?खुप चांगलं : 29 टक्केचांगलं : 43 टक्केवाईट : 15 टक्केअत्यंत वाईट : 10 टक्के
सर्वात भ्रष्ट पक्ष कोणता?काँग्रेस : 41 टक्केभाजप : 44 टक्केजेडीएस : 4 टक्के
लिंगायत समाजाची मतं कुणाला?काँग्रेस : 18 टक्केभाजप : 61 टक्केजेडीएस : 11 टक्के