शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

अल्पवयीन मुलांना कंडोम, गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीवर बंदी घालणारा आदेश मागे; जाणून घ्या, काय आहे कर्नाटकमधील प्रकरण? 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 2:24 PM

कर्नाटक औषध नियंत्रण विभागाने आता फार्मासिस्टना कंडोम आणि गर्भनिरोधक औषधे अल्पवयीन मुलांना विकण्यासाठी बंदी घालण्याबाबतचं कोणतंही परिपत्रक जारी करण्यास नकार दिला आहे.

बंगळुरू : कर्नाटक औषध नियंत्रण विभागाने (KDCD) नुकतेच एक परिपत्रक जारी करून १८ वर्षांखालील महिलांना गर्भनिरोधक (Contraceptive) आणि कंडोमच्या (Condoms) विक्रीवरील वादग्रस्त बंदी मागे घेतली आहे. बंदीमुळे नको असलेली गर्भधारणा आणि लैंगिक संक्रमित रोग (STDs) याबाबत उद्भवणाऱ्या जोखमीबद्दल नवीन वादविवाद सुरू झाले. यानंतर कर्नाटक औषध नियंत्रण विभागाने आता फार्मासिस्टना कंडोम आणि गर्भनिरोधक औषधे अल्पवयीन मुलांना विकण्यासाठी बंदी घालण्याबाबतचं कोणतंही परिपत्रक जारी करण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, राज्य सरकार लैंगिक संक्रमित रोग टाळण्यासाठी आणि लोकसंख्या नियंत्रणासाठी कंडोमचा प्रचार करत आहे. परंतु, ते किशोरवयीन मुलांसाठी किंवा शाळकरी मुलांसाठी नाही, असे राज्याचे प्रभारी औषध नियंत्रक भागोजी टी खानपुरे यांच्या हवाल्याने अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. बंगळुरू मिररच्या वृत्तानुसार, खानापुरे यांनी स्पष्टपणे सांगितले होते की 'अल्पवयीन किशोरवयीन मुलांना गर्भनिरोधक विकू नयेत, असे परिपत्रक कठोरपणे जारी करण्यात आले होते'. नंतर खानपुरे स्वतःच म्हणाले की 'आम्ही अशा आशयाचे कोणतेही परिपत्रक काढले नाही. मीडियामध्ये हे चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले'.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये कंडोम, गर्भनिरोधक, सिगारेट आणि व्हाईटनर सापडल्यानंतर हे परिपत्रक जारी करण्यात आले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये विद्यार्थ्यांना वर्गात मोबाइल फोन घेऊन जाण्यापासून रोखण्यासाठी अचानक तपासणी केली गेली होती. मात्र यानंतर शाळेतील अधिकाऱ्यांना धक्का बसला. बॅगमध्ये सेल फोन व्यतिरिक्त, अधिकार्‍यांना कंडोम, गर्भनिरोधक, लायटर, सिगारेट आणि व्हाईटनर, असे साहित्य इयत्ता 8, 9 आणि 10 वीच्या विद्यार्थ्यांच्या बॅगमधून सापडले होते.

वादग्रस्त आदेश जारी झाल्यानंतर लगेच त्यावर तज्ज्ञ आणि फार्मासिस्ट यांनी टीका केली. यामुळे नको असलेली गर्भधारणा आणि लैंगिक संक्रमित संसर्ग (STIs) यामध्ये वाढ होईल, असे तज्ज्ञ आणि फार्मासिस्ट यांनी म्हटले. तसेच, काहींनी असेही सांगितले की, बंदी प्रभावीपणे लागू केली जाऊ शकत नाही, कारण कंडोम आणि गर्भनिरोधक केवळ फार्मसीच नव्हे तर सर्व स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत. साध्या कपड्यात येणाऱ्या ग्राहकांमध्ये फरक करणं त्यांच्यासाठी अवघड असल्याचेही काही फार्मासिस्टनी म्हटले. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकHealthआरोग्य