सध्या देशात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. टोमॅटो १२० रुपये किलो प्रमाणे मिळत आहेत. गगनाला भिडलेल्या दरामुळे स्वयंपाकघराचे बजेटही बिघडले आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये टोमॅटोचा दर २०० रुपये किलोवर पोहोचला आहे. दरम्यान, आता कर्नाटकात एका शेतकऱ्याच्या शेतातून टोमॅटो चोरीला गेल्याचे समोर आले आहे.
"दिल्लीतील बैठकीने उत्साह वाढला; २०२४ साली महाराष्ट्रात निश्चित सत्तांतर"
आपल्या शेतातून अडीच लाखांचे टोमॅटो चोरीला गेल्याची तक्रार महिला शेतकऱ्याने पोलीस ठाण्यात दिली आहे. हे प्रकरण कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील आहे. महिला शेतकरी धारणी यांनी कर्ज घेऊन टोमॅटो पिकाची लागवड केल्याचे सांगितले. मात्र या टोमॅटोवर बाजारात पोहोचण्यापूर्वीच चोरट्यांनी डल्ला मारला.
शेतकरी महिलेचा आरोप आहे की, ४ जुलैच्या रात्री हसन जिल्ह्यात त्याच्या शेतातून अडीच लाख रुपये किमतीचे टोमॅटो चोरीला गेले. धारणी, २ एकर जमिनीवर टोमॅटो पिकवणारी महिला शेतकरी म्हणाली की, ते पीक कापणी करून ते बाजारात नेण्याचा विचार करत आहेत कारण बेंगळुरूमध्ये किंमत १२० रुपये प्रति किलोच्या पुढे गेली आहे.
आता बीन पिकाचे मोठे नुकसान झाले आणि टोमॅटो पिकवण्यासाठी कर्ज घ्यावे लागले. आमचे पीक चांगले होते आणि भावही जास्त होते. टोमॅटोची ५०-६० पोती घेऊन चोरट्यांनी उरलेले पीकही नष्ट केलेष असंही महिला शेतकऱ्यांनी सांगितले.
महिला शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांनी दोन एकरात पसरलेल्या शेतात रात्री चोरीची ही घटना घडवली. चोरट्यांनी सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे टोमॅटो चोरून पळ काढला. कर्ज घेऊन हे पीक लावले आणि आता काहीच उरले नसल्याचे महिला शेतकऱ्याने सांगितले. याप्रकरणी महिलेने हळेबिडू पोलीस ठाण्यात टोमॅटो चोरीची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.