नवी दिल्ली : कर्नाटकातील एका मंत्र्याने विद्यार्थ्यांसमोर उघडपणे स्वत:चा पर्दाफाश केला आहे. एवढेच नाही तर मंत्री महोदयांनी विद्यार्थ्यांसमोर कॉपी करून पास झालो असल्याची कबुली दिली. मंत्र्याने विद्यार्थ्यांना सांगितले की, त्यांनी परिक्षेत कॉपी करून कसे प्रभुत्व मिळवले आहे आणि कशा पद्धतीने दहावीची परीक्षा पास केली.
कर्नाटकच्या मंत्र्याचा विद्यार्थ्यांसमोर खुलासा दरम्यान, ही घटना कर्नाटक राज्यातील बेल्लारी जिल्ह्यातील आहे. राज्याचे आदिवासी कल्याण मंत्री श्रीरामुलू हे बेल्लारीमध्ये विद्यार्थ्यांच्या एका गटाला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी हे विधान केले आणि सर्वांचे लक्ष वेधले. परिक्षेच्या काळात कॉपी करण्यात आम्ही चॅम्पियन असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीरामुलू पुढे म्हणाले की, ट्यूशनमध्ये दररोज सर्वांसमोर त्यांचा अपमान केला जायचा. शिक्षक मूर्ख म्हणून देखील टोला मारायचे. दहावी पास झाल्याबद्दल आमचे शिक्षक आश्चर्य देखील व्यक्त करायचे. यानंतर श्रीरामुलू यांनी शिक्षकांना सांगितले की, कॉपी करूनच ते परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. याशिवाय मी या कॉपी करण्याच्या विषयात पीएचडी केली असल्याचे देखील मंत्री महोदयांनी शिक्षकांना सांगितले होते.
अलीकडेच राज्याचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी देखील वादात सापडले होते. त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते काँग्रेस नेते आणि माजी विधानसभा अध्यक्षांना शिवीगाळ करताना दिसत होते. काँग्रेसनेही आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र, वाद वाढल्यानंतर कुमारस्वामी यांनी माफी देखील मागितली होती.
व्हिडीओमध्ये कुमारस्वामी ज्या काँग्रेस नेत्याला शिवीगाळ करताना दिसत होते, त्यांचे नाव केआर रमेश कुमार आहे. ते राज्यातील विधानसभेचे १६वे सभापती ठरले आहेत. कुमारस्वामी यांचा व्हिडीओ कर्नाटक काँग्रेसने त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून शेअर केला आहे. पक्षाने व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, "श्रीनिवासपूर विधानसभा मतदारसंघात कुमारस्वामी कारमध्ये बसलेले पाहायला मिळत आहेत. यादरम्यान ते माजी स्पीकर केआर रमेश कुमार यांना शिवीगाळ करत आहे."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"