बंगळुरू- कर्नाटकात बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगा-याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बंगळुरूतल्या त्यागराज नगर क्षेत्रामध्ये ही दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीत काम सुरू असतानाच ती अचानक कोसळली, त्यामुळे इमारतीच्या ढिगा-याखाली अनेक मजूर अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. परंतु अद्यापही कोणतीही जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही. सध्या तरी पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, स्थानिकांच्या मदतीनं बचावकार्य राबवलं जात आहे.
कर्नाटकात इमारत कोसळली, ढिगा-याखाली अनेक जण अडकल्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 9:23 PM