शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

'कलम 370 वरील लक्ष हटविण्यासाठीच अटक', पिताच्या अटकेनंतर पुत्र कार्ती दिल्लीकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 8:27 AM

P. Chidambaram Arrested : चिदंबरम यांच्या अटकेनंतर प्रथमच पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

ठळक मुद्देचिदंबरम यांच्या अटकेनंतर प्रथमच पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबर यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. तब्बल 10 ते 12 तास मी सातत्याने चौकशीला गेलो आहे. मात्र, अद्याप माझ्याविरुद्ध कुठलंही दोषारोपपत्र दाखल झालेलं नाही.

नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया प्रकरणात अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर पी. चिदंबरम यांना सीबीआयने बुधवारी रात्री उशिरा अटक केली आहे. जोरबाग येथील त्यांच्या निवासस्थानातून त्यांना अटक करण्यात आली. २७ तासानंतर पी. चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू मांडली. त्यानंतर ते जोरबाग येथील निवासस्थानी पोहचले. याठिकाणी सीबीआयची टीम दाखल झाली. विशेष म्हणजे चिदंबरम यांना अटक करण्यासाठी १ तासांपासून सीबीआयचे अधिकारी चिदंबरम यांच्या घरात ठाण मांडून बसले. 

चिदंबरम यांच्या अटकेनंतर प्रथमच पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबर यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. केवळ 370 प्रकरणावरुन लोकांच लक्ष हटविण्यासाठी सरकारने माझ्या वडिलांना अटक केल्याचं कार्ती यांनी म्हटलं आहे. काँग्रेस पक्षाची आणि पी चिंदंबरम यांची प्रतिमा मलिन करण्याचा सरकारचा डाव आहे. याप्रकरणाला विनाकारण मोठं बनविण्यात आलं आहे, ज्यामध्ये चिदंबरम यांचा काहीही संबंध नाही. मलाही सीबीआयने 4 ते 5 वेळा नोटीस बजावली होती. मी सीबीआयचा पाहुणाच बनलो होतो. तब्बल 10 ते 12 तास मी सातत्याने चौकशीला गेलो आहे. मात्र, अद्याप माझ्याविरुद्ध कुठलंही दोषारोपपत्र दाखल झालेलं नाही. त्यामुळे, आम्ही कायदेशीर आणि राजकीय मार्गाने आमचा लढा सुरूच ठेऊ असे कार्ती चिदंबरम यांनी म्हटले आहे. चेन्नईवरुन दिल्लीला जाण्यापूर्वी कार्ती यांनी चेन्नई विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, सीबीआयने पी चिदंबरम यांची कसून चौकशी करताना, आयएनएक्स मीडिया, पीटर मुखर्जी, इंद्राणी मुखर्जी यांच्याबद्दलही प्रश्न केले आहेत. 

सीबीआयची टीम पी. चिदंबरम यांच्या घरी दाखल झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्तेही मोठ्या संख्येने चिदंबरम यांच्या घराबाहेर जमा झाले होते. नरेंद्र मोदी सरकार सत्तेचा दुरुपयोग करून चिदंबरम यांना अडकविण्याचे प्रयत्न करत आहे असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. सीबीआयचे मुख्य संचालकही पी. चिदंबरम यांच्या घरी दाखल झाले. कार्यकर्त्यानी मोदी विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. यादरम्यान पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.  २७ तासांनंतर बेपत्ता झालेले पी. चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना पी. चिदंबरम यांनी आयएनएक्स प्रकरणात मी कधीही आरोपी नव्हतो. माझ्यावर कोणतंही आरोपपत्र दाखल झालं नाही, असा दावा केला आहे. ही पत्रकार परिषद संपल्यानंतर पी. चिदंबरम हे जोरबाग येथील त्यांच्या निवासस्थानी पोहचले. त्यानंतर काही वेळातच सीबीआयची टीमही त्यांच्या घरी दाखल झाली होती. 

दरम्यान, सीबीआय किंवा ईडीने कोणतंही आरोपपत्र दाखल केलेलं नाही, माझा मुलभूत हक्क हिरावला जातोय. मागील २७ तासांपासून अनेक भ्रम पसरविले जात आहेत. मी आणि माझं कुटुंब यात दोषी नाही. कोणत्याही आरोपपत्रात माझं नाव नाही. सुप्रीम कोर्टात याबाबत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. शुक्रवारी याबाबत सुनावणी होईल. गेल्या २७ तासांत वकिलांसोबत पुढील लढण्याची तयारी करत होतो. रात्रभर कागदपत्रे तयार केली जात होती. तपास यंत्रणांही कायद्याचं पालन केलं पाहिजे असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमKarti Chidambaramकार्ती चिदंबरमPoliceपोलिसCBIगुन्हा अन्वेषण विभाग