शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कार्ती चिदंबरम यांची इंद्राणीसमोर चौकशी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 06:26 IST

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम याची सीबीआयच्या पथकाने रविवारी भायखळा महिला कारागृहात इंद्राणी मुखर्जी हिच्यासमोर तब्बल चार तास चौकशी केली.

मुंबई  - माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम याची सीबीआयच्या पथकाने रविवारी भायखळा महिला कारागृहात इंद्राणी मुखर्जी हिच्यासमोर तब्बल चार तास चौकशी केली. आयएनएक्स मीडियाला परदेशी निधी मिळवून देण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप कार्तीवर आहे.शीना बोरा हत्येप्रकरणी इंद्राणी मुुखर्जी गेल्या अडीच वर्षांपासून कारागृहात आहे. या प्रकरणाचा तपासही सीबीआय करीत आहे. २००७ मध्ये आयएनएक्स मीडियाला ३०० कोटींची परकीय गुंतवणूक आणण्यासाठी कार्ती चिदंबरमने लाच मागितली होती. वडील अर्थमंत्री असल्याने तुमच्या कंपनीला फायदा करून चिदंबरमने लाच मागितली होती. वडील अर्थमंत्री असल्याने तुमच्या कंपनीला फायदा करून देऊ, असे कार्तीने आपल्याला सांगितले होते, असा जबाब तिने १७ फेबु्रवारीला महानगर दंडाधिकाºयांसमोर दिला आहे. त्यानंतर कार्तीविरुद्ध फास आवळून सीबीआयने चार दिवसांपूर्वी त्याला अटक केली.या प्रकरणी सखोल तपास करण्यासाठी सीबीआयचे दिल्लीचे पथक कार्तीला घेऊन विमानाने सकाळी मुुंबईत दाखल झाले. सव्वाअकराच्या सुमारास भायखळा महिला कारागृहात नेण्यात आले. या ठिकाणी एका खोलीत कार्तीला इंद्राणीसमोर बसविण्यात आले. इंद्राणीने दिलेल्या माहितीवरून कार्तीकडे विचारणा करण्यात आली. आयएनएक्स प्रकरणी त्यांच्यामध्ये झालेली चर्चा, व्यवहाराच्या अनुषंगाने सुुमारे चार तास प्रश्नोत्तरे झाली. त्यांच्या संभाषणाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग घेण्यात आले. त्यानंतर साडेतीनच्या सुमारास कार्तीला घेऊन पथक जेलमधून बाहेर पडले. या वेळी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी सीबीआय अधिकाºयांकडे चौकशीबाबत विचारणा केली असता त्यांनी काहीही सांगण्यास नकार देत ते विमानतळाच्या दिशेने निघून गेले. सायंकाळच्या विमानाने पथक दिल्लीकडे रवाना झाले.प्रसारमाध्यमांना सामोराकार्र्ती चिदंबरम याला चौकशीसाठी मुंबईतील भायखळा जेलमध्ये आणण्यात आल्याचे समजल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी या परिसरात मोठी गर्दी केली.कार्ती चिदंबरमने चौकशीनंतर कारागृहाबाहेर पडताना गाडीच्या फुटबोर्डवर उभे राहत स्मितहास्य करीत प्रसारमाध्यमांच्या दिशेने हात हलविला.

टॅग्स :Karti Chidambaramकार्ती चिदंबरम