नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया मनी लाँण्डरिंग प्रकरणात सीबीआयने अटक केलेले पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांना गुरुवारी विशेष न्यायालयाने सहा दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. आज सीबीआयनं त्यांची कसून मॅरेथॉन चौकशी केली. नवी दिल्लीच्या सीबीआयने आज आपल्या मुख्यालयामध्ये कार्ति यांची पाच ते सहा तास चौकशी केली. यावेळी त्यांना पुरावे दाखवत त्यावर स्पष्टीकरण मागितले. यावेळी कार्ति यांचे वकिल त्यांना भेटण्यासाठी सीबीआय मुख्यालयात आले होते. आज सकाळी आठ वाजल्यापासून सीबीआयने कार्ति चिदंबरम यांची चौकशी सुरु केली होती.
मिळालेल्या वृत्तानुसार, कार्ति यांना सुरुवातीला एफपीआयबी अप्रूवलवर विचारणा केली. सर्व पुरावे सीबीआयने यावेळी कार्ति यांच्यापुढे ठेवत त्यावर स्पष्टिकरण मागितले. आपल्या विदेश दौऱ्यावर असताना वित्त मंच्रालयाच्या गुप्त कागदपत्रांशी छेडछाड केली होती. त्यावरही प्रश्न विचारण्यात आले आहे. त्याचप्रमाणे चेस मँनेजमेंटबाबतीतही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी सर्व पुरावे समोर ठेवले होते. जेणेकरुन कार्ति यांना खोटं बोलता येणार नाही असा सीबीआयचा उद्देश होता.
काल विशेष न्यायाधीश सुनील राणा यांनी कार्ती यांची कोठडी ६ मार्चपर्यंत वाढविली. तथापि, कार्ती यांच्या वकीलांना त्यांना दररोज सकाळ व संध्याकाळ एक-एक तास भेटण्यास परवानगी दिली आहे. सीबीआयने न्यायालयात सांंगितले की, कार्ती यांनी विदेशातून जाऊन जे काही केले त्याचे आमच्याकडे ठोस पुरावे आहेत.
कार्ती चिदंबरम यांच्यावर शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्स मीडिया या कंपनीला 2007मध्ये नियमापेक्षा अधिक विदेशी गुंतवणूक मिळवून दिल्याचा आरोप आहे. कंपनीला फक्त 4.62 कोटींची विदेश गुंतवणूक करण्याची परवानगी असताना त्यांनी 305 कोटी रुपये उभे केले होते. कार्ती चिदंबरम यांनी आपल्या वडिलांच्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोपही लावण्यात आला होता.
सीबीआय म्हणजे गाणारे पोपट : सिब्बलसीबीआयकडून कार्ती चिदंबरम यांना झालेली अटक म्हणजे भारतीय तपास संस्था आता केवळ सरकारी पिंजºयातील बंद पोपट नाहीत तर, गाणारे पोपट आहेत हे सिद्ध होत आहे, अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी गुरुवारी सीबीआयला लक्ष्य केले.