वाराणसी: काशी विश्वनाथ मंदिराला (Kashi Vishwanath Temple) एका भक्ताने तब्बल 60 किलो सोने दान केले आहे. त्यातील 37 किलो सोने गर्भगृहाच्या आतील भिंतींवर वापरण्यात आले आहे. काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटनापूर्वी एक भाविक मंदिर प्रशासनाच्या संपर्कात आला होता. मात्र, त्या भाविकाने आपले नाव सांगण्यास नकार दिला आहे.
सोन्याचा वापर कसा झाला?13 डिसेंबर 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन केले. त्यापूर्वी हा भाविक मंदिर अधिकाऱ्यांच्या संपर्कात आला होता. त्याच्या देणगीच्या ऑफरनंतर, मंदिराच्या अधिकाऱ्यांनी दान केलेल्या सोन्याचा वापर गर्भगृहाची आतील भिंत आणि मुख्य मंदिराच्या घुमटाचा खालचा भाग झाकण्यासाठी केला जाईल अशी योजना देखील अंतिम केली होती.
दिल्लीच्या कारागीरांनी केले काममंडल अधिकारी दीपक अग्रवाल यांनी सांगितले की, 'हे काम पूर्ण करण्यासाठी दिल्लीतील एक कंपनीला काम दिले होते. या कंपनीच्या कारागिरांनी गर्भगृहाच्या कलात्मक भिंती ताम्रपटांच्या साहाय्याने बनवल्या. भिंती तयार झाल्यानंतर लावल्यानंतर त्यावर या भाविकाने दान केलेल्या सोन्याचा मुलामा चढवण्याची प्रक्रिया करण्यात आली.
18व्या शतकानंतर सर्वात मोठे काममिळालेल्या माहितीनुसार, 18व्या शतकानंतर मंदिराच्या कोणत्याही भागावर सोन्याचा मुलामा चढवण्याचे हे दुसरे सर्वात मोठे काम आहे. काशी विश्वनाथ मंदिराच्या इतिहासानुसार, 1777 मध्ये इंदूरच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराची पुनर्बांधणी केल्यानंतर, पंजाबचे महाराजा रणजित सिंह यांनी मंदिराच्या दोन घुमटांना झाकण्यासाठी सुमारे एक टन सोने दान केले होते.